Wednesday, February 4, 2026
HomeनगरCrime News : संगमनेरातील दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; साडेदहा लाखांचा मुद्देमाल...

Crime News : संगमनेरातील दोन मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर (प्रतिनिधी)

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची जिल्हाभरातील अवैध धंद्यांवर वक्रदृष्टी पडली असून, त्यांच्या विशेष पथकाने कारवायांचा सिलसिला सुरू केल्याने अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

संगमनेरमध्येही शुक्रवारी (दि.20) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन ठिकाणी सुरू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यांवर छापेमारी करत 10 लाख 46 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तब्बल 35 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

YouTube video player

विशेष पथकातील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहरातील तेलीखुंट व कोल्हेवाडी रोड परिसरात सुरु असलेल्या मटका अड्ड्यांवर ही कारवाई केली आहे. यापुढेही कारवाया सुरूच राहणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी सांगितले. यामुळे अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Nashik BJP Politics : भाजप शहराध्यक्ष सुनील केदारांचा तडकाफडकी राजीनामा

0
नाशिक | प्रतिनिधी भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनी आपल्याकडे असलेल्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली...