Monday, September 14, 2026
HomeनगरSangamner : संगमनेरच्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने संभ्रम

Sangamner : संगमनेरच्या स्ट्राँगरुमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याने संभ्रम

उमेदवारांसह प्रतिनिधींनी घेतली धाव || प्रशासनाने केले शंकांचे समाधान

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

राज्याचे लक्ष असलेल्या संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम मशिन हे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्राँगरूम मध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र या स्ट्राँगरूमवर नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे रविवारी (दि.7) साधारण एक तास बंद झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे उमेदवारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हार्डडिस्क भरल्याने त्या बदलण्यासाठी कॅमेरे बंद झाले होते. या संपूर्ण प्रक्रियेचे देखील चित्रण करण्यात आलेले असून, उमेदवारांच्या शंकाचे समाधान केले असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिले.

- Advertisement -

मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशिन उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधी यांच्या साक्षीने बंद करण्यात आले आणि त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. मात्र रविवारी हे सीसीटीव्ही कॅमेरे साधारण एक तास बंद झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे तातडीने संगमनेर सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

मात्र, हार्डडिस्क भरल्याने ती बदलण्यासाठी कॅमेरे बंद झाले होते. ही प्रक्रिया करत असताना त्यांचे संपूर्ण चित्रण करण्यात आलेले आहे. तेथे उपस्थित उमेदवार व प्रतिनिधींच्या शंकांचे समाधान केले असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिले. दरम्यान, ईव्हीएम मशिन आणि त्याची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याची वार्ता पसरताच उमेदवारांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

स्ट्राँगरुमसाठी कार्यरत असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या हार्डडिस्क भरल्यामुळे त्या बदलण्यात आल्या. अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत ही हार्डडिस्क बदलण्याची प्रक्रिया उमेदवारांच्या समोरच करण्यात आली, या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रण देखील करण्यात आलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
अरुण उंडे (निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी-संगमनेर)

ताज्या बातम्या

Nashik News : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना; मंदिरावर झेंडा लावताना...

0
सातपूर | Satpur गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सातपूर परिसरातील (Satpur Area) जेपी नगर येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हनुमान मंदिरावर (Hanuman Mandir) भगवा झेंडा...