Thursday, May 2, 2024
Homeनगरसंगमनेरात धमकी देऊन तरुणीचा विनयभंग

संगमनेरात धमकी देऊन तरुणीचा विनयभंग

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा (crime of atrocity) दाखल करू अशी धमकी (Threat) देऊन तरुणीचा विनयभंग (molesting) केल्याची घटना शहरातील मालदाड रोड (Maldad Road) परिसरात काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरपीआयच्या पदाधिकार्‍यांसह (RPI office bearers ) अन्य एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून (City Police) समजलेली माहिती अशी की, शहरातील मालदाड रोड परिसरात राहणार्‍या एका कुटुंबियांसोबत राजू यादव खरात रा. घुलेवाडी व धीरज सोमनाथ ढगे रा. संगमनेर यांचा जमिनीवरून वाद आहे. काल सकाळी राजू यादव खरात व धीरज ढगे हे या कुटुंबियांच्या घरात गेले. यावेळी 25 वर्षाची तरुणी घरात एकटीच ऑनलाईन अभ्यास करत होती. मी दलित पँथरचा अध्यक्ष आहे. आम्ही अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू (Let’s file a crime of atrocity), तुम्ही आमचे काही करू शकत नाही असे म्हणून राजू खरात याने सदर तरुणीचा हात धरुन तिला ओढले. यावेळी त्याने तिच्याशी अश्लिल वर्तन केले. ढगे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याबाबत सदर तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी राजू यादव खरात व धीरज सोमनाथ ढगे यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम 452,354,323,504,506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फटांगरे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या