Tuesday, January 6, 2026
HomeनगरSangamner : गटारीचे काम करताना गुदमरुन दोन कामगारांचा मृत्यू

Sangamner : गटारीचे काम करताना गुदमरुन दोन कामगारांचा मृत्यू

एक गंभीर |\ दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

येथील नगरपालिकेच्या सांडपाणी प्रकल्पांतर्गत कोल्हेवाडी रस्त्यावरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलशेजारी सुरू असलेल्या भूमिगत गटार कामादरम्यान गटारात काम करत असताना विषारी वायूच्या संपर्कात आल्याने गुदमरुन दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल (गुरुवारी) दुपारी ही दुर्घटना घडली.

- Advertisement -

अतुल रतन पवार (वय 19) व रियाज जावेद पिंजारी (वय 22) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. संगमनेर नगरपालिकेने सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्याचे काम सुरू केले आहे. गुरुवारी कोल्हेवाडी रस्त्यावरील कामाच्यावेळी एका कामगाराला श्वास घेण्यास त्रास होवू लागला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या काही कामगारांचा आणि नागरिकांचाही गटारात श्वास कोंडला. यामुळे एकच गोंधळ उडाला.

YouTube video player

या घटनेची माहिती मिळताच शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पोलीस अधिकारी व अग्निशन दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले. गटारात बेशुद्ध पडलेले अतुल रतन पवार (वय 19, रा. संजय गांधीनगर, संगमनेर), रियाज जावेद पिंजारी (वय 22) व आणखी एक या तिघांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात हलवले. यातील अतुल पवार याचा उपचारापूर्वी तर रियाज पिंजारी याचा खासगी रुग्णालयात उपचारदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कोल्हेवाडी रस्त्यावरील भूमिगत गटारीचे काम सुरू असताना दोन कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अतुल रतन पवार व रियाज पिंजारी या कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत.
– अमोल खताळ (आमदार-संगमनेर)

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....