Wednesday, May 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: पत्रकार परिषद संपताच संजय राऊतांची तब्येत बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Sanjay Raut: पत्रकार परिषद संपताच संजय राऊतांची तब्येत बिघडली; रुग्णालयात केले दाखल

मुंबई | Mumbai
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना अचानक प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील भांडुप इथल्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये संजय राऊत यांना दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी केली होती. अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने फोर्टिज रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

राऊत हे काही वेळापूर्वीच भांडूप येथील त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना दिसले होते. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे, असे वक्तव्य केले. तसेच, गेल्या कित्येक दिवसांपासून संजय राऊत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबत सातत्याने वक्तव्य करत आहे. तसेच, शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने पक्षाची भूमिकाही प्रभावीपणे मांडत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नसून, गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीत होत असलेल्या चढ-उतारांमुळे त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊत यांच्यावर सध्या फोर्टीस रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत थोडी खालवली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते तपासणीसाठी गेले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे केवळ रुटीन चेकअप असल्याने, तपासण्या पूर्ण झाल्यावर त्यांना आज संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Rahata : हुंड्यासाठी छळ! विवाहितेचा विहिरीत उडी घेऊन शेवट

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata पैशांची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय राहाता तालुक्यात आला आहे. घराच्या बांधकामासाठी माहेरून 4 लाख रुपये घेऊन ये,...