Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूज११ लाखांची पैंज लावतो! संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना थेट आव्हान; म्हणाले, मुंबई...

११ लाखांची पैंज लावतो! संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना थेट आव्हान; म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत…

मुंबई | Mumbai
राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा उमेदवार आणि त्या पक्षाची नेतेमंडळी मतदारांच्या दारोदारी जाऊन आपला प्रचार करत आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “भाजपने हिंदू-मुस्लिम मुद्द्याशिवाय लढवलेली एकतरी निवडणूक दाखवावी, मी तुम्हाला ११ लाख रुपये देतो,” असे आव्हानच त्यांनी फडणवीसांना दिले.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी आणि कचरा यांसारख्या नागरी सुविधांवर चर्चा व्हायला हवी. परंतु, भाजपा तिथेही अयोध्या, जय श्रीराम आणि बाबरी मशीद असे धार्मिक मुद्दे आणून लोकांची दिशाभूल करत आहे. आज जी मुंबई दिसत आहे, त्यात ५६ पेक्षा जास्त उड्डाणपूल आणि मोठे प्रकल्प हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून उभे राहिले आहेत. तेव्हा भाऊसाहेब, देवेंद्र भाऊ आमच्या सोबतच होता. जे काम शिवसेनेने केले आहे, त्याचे श्रेय चोरू नका, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

- Advertisement -

“ज्या पक्षासाठी आयुष्य वेचले तो पक्ष…”; सच्चा शिवसैनिकाने सोडली ठाकरेंची साथ, शिंदेंच्या शिवसेनेत केला प्रवेश

YouTube video player

राऊत म्हणाले, आमची संपूर्ण हयात मुंबईत मराठी माणसाचे हक्क टिकवण्यात गेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तर उभे राहिले आहे, पण मराठी माणसाला ताठ मानेने जगता येणे, हाच खरा विकास आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि जबाबदार नेते आहात. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीने खोटे बोलणे तुम्हाला शोभत नाही. जे काम झाले आहे ते झाले आहे, जे नाही झाले ते नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली.

यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना आव्हान देत एक लाख रुपये देतो, या विधानाबाबतची विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊतांनी फडणवीसांना पुन्हा डिवचत म्हटले की, उद्धव ठाकरेंचे एक लाख आणि त्यात माझे पाच लाख रुपये मिळून मी सहा लाख रुपये द्यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस हे जर स्वतःला शूर आणि महान समजत असतील, तर त्यांनी हे चॅलेंज स्वीकारावे आणि हिंदू-मुस्लिम वादाशिवाय निवडणूक लढवून दाखवावी. चला मी १० लाख रुपये देतो. म्हणजेच, शिवसेना प्रमुखांचे एक लाख आणि माझे १० लाख रुपये असे ११ लाख रुपये मी देतो, पण देवेंद्र फडणवीसांनी हे आव्हान स्वीकारावे आणि हिंदू- मुस्लीमशिवाय केलेले भाषण दाखवावे, असे राऊतांनी म्हटले.

दरम्यान, भाजपाला असे वाटते की जनता मूर्ख आहे आणि त्यांच्या सर्व पाप कर्मांना जनता मान्यता देईल. भाजपाला असे वाटते की महाराष्ट्रात ‘हम करे सो कायदा’ मान्य केला जाईल. मात्र, जनतेचा रोष पाहून या आठवड्यात तिसऱ्यांदा सरकारला माघार घ्यावी लागली आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....