Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: "एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील अत्यंच कच्चं मडकं"; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर...

Sanjay Raut: “एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील अत्यंच कच्चं मडकं”; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका

मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या समोरच जय गुजरातचा नारा दिला. यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. तो कार्यक्रम गुजराती समाजाचा होता. गुजराती समाजाने महाराष्ट्राच्या विकासात दिलेले जे योगदान आहे त्या अनुषंगाने जय गुजरात म्हटले. गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील कच्चं मडकं
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील अत्यंत कच्चं मडकं आहेत. सध्याच्या राजकीय स्थितीला ते गोंधळले आहेत. त्यातून ते अशी विधाने करत आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘जय गुजरात’ विधानावरील स्पष्टीकरणावरुन केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसच एकनाथ शिंदेंना अडचणीत आणत आहेत. वारंवार अशा भूमिका घ्या असे उत्तेजन देत आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही कुठे म्हणतो गुजरात पाकिस्तानमध्ये आहे? गुजरात आणि महाराष्ट्र कधीकाळी एकच होता. एकनाथ शिंदेंना माहिती नसेल. बडोदा हे मराठा संस्था आहे. बडोदा आणि गुजरातवर गायकवाड आणि भोसले यांचे राज्य होते, म्हणून अमित शाह किंवा मोदी बडोद्याला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. इंदूर, ग्वाल्हेर हे होळकर आणि शिंदे यांची मराठी राज्य आहेत. मी फडणवीस यांना सांगू इच्छितो की, पेशवे देखील तिकडेच गेले होते. इतिहास मला देखील माहित आहे. योगी आदित्यनाथ हे तिथे जय महाराष्ट्र म्हणत नाही ते जय उत्तर प्रदेशच म्हणतील. त्यामुळे उगाचच सारवासारव करू नका. महाराष्ट्राला अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करत आहात. खरे म्हणजे फडणवीसच शिंदेंना अडचणीत आणत आहेत. उत्तेजन देत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

शिंदे-फडणवीस माफी मागा
संजय राऊत पुढे म्हणाले की, गुजरातच्या आमच्या बांधवांनी महाराष्ट्रामध्ये विकास कामे केली. पैसे काय काय कमावले? संपत्ती काय काय कमवली? उपकार करताय का? पारसी समाजाने सुद्धा येथे योगदान दिले आहे. सगळ्यात जास्त योगदान मुंबईच्या उभारण्यात पारसी समाजाचे आहे. मिस्टर शिंदे, तुम्ही मराठी माणसाचा अपमान करत आहात. ही मुंबई मराठी मजूर, श्रमिक, गिरणी कामगार यांच्या रक्तातून आणि घामातून निर्माण झाली आहे. या शेठजींच्या पैशातून नाही निर्माण झाली. शिंदेंनी उगाच काहीही स्पष्टीकरण देऊ नये. एकनाथ शिंदे यांनी सर्वात अगोदर माफी मागायला हवी. तर शिंदेंची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीसांनी पण माफी मागायला हवी अशी मागणी राऊतांनी केली. फडणवीस जितके बोलतील तितके ते अडचणीत येतील. त्यांनी शांत राहणेच योग्य असल्याचा टोला राऊतांनी यावेळी लगावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : स्वेच्छानिवृत्तीचा दुष्काळात तेरावा!

0
'नाव सोनूबाई हाथी कथलाचा वाळा' ही म्हण नाशिकच्या महापालिकेला सध्यातरी तंतोतंत लागू पडते. कारण राज्यातील काही मोठ्या महापालिकांमध्ये नाशिकची गणना होते. सुमारे साडेतीन हजार...