Tuesday, July 23, 2024
HomeराजकीयSanjay Raut : "… तर लोक 'त्यांना' रस्त्यावर बांबूचे फटके मारतील"; राऊतांचा...

Sanjay Raut : “… तर लोक ‘त्यांना’ रस्त्यावर बांबूचे फटके मारतील”; राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल एका कार्यक्रमात बोलतांना ‘काही लोक असे आहेत की सकाळीच भोंगा वाजतो, एक भोंगा निघाला तर दुसरा चालू झाला.त्यामुळे भोंगा वाजवणाऱ्या काही लोकांना बांबू लावला पाहिजे,असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे नाव न घेता टोला लगावला होता. त्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युतर देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे देखील वाचा : Raj Thackeray : “महाराष्ट्रात जातीय विष कधीही…”; ओबीसी-मराठा आरक्षण वादावर राज ठाकरेंचे परखड भाष्य

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “सध्याचे मुख्यमंत्री (CM) हे घटनाबाह्य असून बेकायदेशीर आहे असे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितले आहे. मात्र, तरीही हे सरकार निर्लज्जपणे महाराष्ट्राच्या बोकांडी मोदी आणि शाहांनी बसवले आहे.खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) आणि शिंदेंना बांबू लागलेला आहे. त्यांच्या महायुतीला (Mahayuti) आम्ही सर्वांनी मिळून जो बांबू घातला आहे, तो अजून निघालेला नाही. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांना स्वप्नातही बांबू दिसत आहे, अशी जोरदार टीका राऊत यांनी केली.

हे देखील वाचा : छगन भुजबळांचे जरांगेंच्या मागणीवर प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचा अभ्यास कमी, मुस्लिम समाजाला…”

तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या आणि याच बांबूचे फटके लोक सगळ्या गद्दारांना रस्त्यावर मारतील. त्यांना आता बांबूची आठवण झाली आहे.लोकसभेला लागलेला बांबू ऑपरेशन करून काढावा की कसा हा प्रश्न त्यांना पडला आहे.की मोदी-शाहाच त्यांना बांबू घालतात, या बांबूवर आता ते अभ्यास करतील, त्यावर त्यांना एखादी बोगस डिग्री मिळू शकते, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता यावर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या