Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ हेक्टर जागा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला ३ हेक्टर जागा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

भाविकांच्या सुविधेसाठी तसेच गोमाता संवर्धनासाठी या जागेचा होणार वापर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी तसेच गोमाता संवर्धनासाठी राज्य सरकारने यमाई तलावालगतची गट नं. १६१ मधील ३ हेक्टर १२ गुंठे इतकी शासकीय जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता दिली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी यासंदर्भातील माहिती दिली.

मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जागेची मागणी केली होती. भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि ‘गोमाता पालन-संवर्धन केंद्र’ याठिकाणी उभारण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी (गोमाता संवर्धन आणि भाविकांची सुविधा) या जागेचा वापर सुरू करणे बंधनकारक राहील .

ज्या कामासाठी जमीन दिली आहे, केवळ त्याच कामासाठी तिचा वापर करता येईल. इतर कोणत्याही तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी वापरासाठी सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आता पुढील कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...