Friday, May 3, 2024
Homeनाशिकसंजय राऊतांच्या 'त्या' कृतीवर अजित पवारांचे टीकास्त्र; राऊतांचेही दादांना जोरदार प्रत्युत्तर

संजय राऊतांच्या ‘त्या’ कृतीवर अजित पवारांचे टीकास्त्र; राऊतांचेही दादांना जोरदार प्रत्युत्तर

नाशिक | Nashik

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधत काल खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याविषयी प्रश्न विचारल्यावर थुंकण्याच्या केलेल्या कृतीवर स्पष्टीकरण देत विविध विषयांवर भाष्य केले आहे. तसेच संजय राऊत यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन भगवान त्र्यंबकराजाचे देखील दर्शन घेतले.

- Advertisement -

Video : लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरकडे सापडलं मोठं घबाड; एसीबी तपासात धक्कादायक माहिती उघड

यावेळी राऊत म्हणाले की, मी कुणावरही थुंकलो नाही. वीर सावरकरांना एकदा कोर्टात आणले गेले. वीर सावरकरांनी पाहिले की त्यांची माहिती देणारा बेईमान कोपऱ्यात उभा आहे. त्याच्याकडे बघून वीर सावरकर थुंकले होते. त्यामुळे बेईमान्यांवर थुंकणे ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा एक भाग आहे. मी कुणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनीही बेईमान्यांवर थुंकणे ही संस्कृती असल्याचे दाखवून दिले होते. इतिहासात त्याची नोंद आहे असे राऊत यांनी म्हटले आहे.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल महागले; महाराष्ट्रात ‘असे’ आहे नवीन दर

तर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थुंकण्याच्या कृतीवरून नेत्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे असे म्हणत राऊतांना सुनावले होते. त्यावर देखील राऊतांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी राऊत म्हणाले की, धरणामध्ये मुतण्याचे वक्तव्य करण्यापेक्षा थुंकणे चांगले असे म्हणत ज्याचं जळतं त्याला कळतं असे म्हटले. तसेच आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटे येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांना टोला लगावला.

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार पलटी होऊन दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

दरम्यान, संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीचा शिवसेना शिंदे गटाकडून (Shinde Group) तीव्र निषेध केला जात असून राज्यभर विविध ठिकाणी राऊत यांच्या विरोधात ‘जोडे मारो आंदोलन’ केले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांकडून वाढ करण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या