Wednesday, September 9, 2026
HomeराजकीयSanjay Raut : शरद पवार गट भाजपसोबत जाणार? खासदार संजय राऊतांनी केला...

Sanjay Raut : शरद पवार गट भाजपसोबत जाणार? खासदार संजय राऊतांनी केला सर्वात मोठा खुलासा

मुंबई । Mumbai

संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्र सरकारकडून आगामी अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक मांडले जाण्याची शक्यता असून, या विधेयकाला महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा पाठिंबा मिळणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. इतकेच नव्ह्हे तर, शरद पवार गट थेट भाजपसोबत हातमिळवणी करून महायुती सरकारच्या सत्तेत सामील होणार, अशाही वावड्या उठल्या आहेत. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत घेतलेल्या धडाकेबाज पत्रकार परिषदेत या सर्व चर्चा फेटाळून लावत सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला.

- Advertisement -

“शरद पवार गट भाजपसोबत जाणार या चर्चांमध्ये काडीचेही तथ्य नाही. महायुती आणि शिंदे-भाजपकडून महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि जनमानसात संशय पेरण्यासाठी या जाणीवपूर्वक पसरवलेल्या निव्वळ अफवा आहेत,” असे स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते जयंत पाटील यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट पूर्णपणे वेगळ्या कारणासाठी होती, अशी माहितीही त्यांनी दिली. इस्लामपूरच्या एका लोकांतून निवडून आलेल्या नगराध्यक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे अपात्र ठरवले असून, त्याच अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले होते, असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले की, कालच्या बैठकीत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित असल्याच्या बातम्या अर्धवट आणि खोट्या आहेत. प्रफुल पटेल सध्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी परदेशात आहेत, त्यामुळे ते त्या बैठकीला असणे शक्यच नाही. राजकीय वर्तुळातील या नव्या वावड्या ऐकून स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनाही प्रचंड आश्चर्य वाटले आहे. राऊत यांनी आजच सुप्रिया सुळे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली असून, सुप्रिया सुळे स्वतः आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन या सर्व वावड्यांचा समाचार घेणार आहेत आणि आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणार आहेत.

याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. “काल मुख्यमंत्री मुंबईतून ६ फुटीर खासदार म्हणजेच चोरीचा माल गाठोड्यात बांधून दिल्लीत अमित शाह यांना भेटायला गेले. देशात पोलीस यंत्रणा चोरीचा माल या स्वरूपाची गोष्टी दिसताच तात्काळ कारवाई करते, मात्र इथे राजकीय स्वार्थासाठी उघडपणे दिल्लीत फेऱ्या मारून सत्तेचा मलिदा मागितला जात आहे आणि त्यावर कोणतीही कारवाई होत नाही,” असा जबरी टोला राऊतांनी लगावला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावाखाली चाललेला हा खेळ महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे ते म्हणाले.

१८ जुलै रोजी नागपूर येथे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ‘रामरक्षा आंदोलना’ला प्रशासनाकडून मैदान देण्यास टाळाटाळ होत असल्याबद्दल राऊतांनी तीव्र संताप व्यक्त केला. “त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असल्याने मैदान आधीच बुक केल्याचे सांगितले जात आहे. सत्ताधाऱ्यांचा वाढदिवस प्रभू रामचंद्रांपेक्षा मोठा झाला आहे का?” असा सवाल त्यांनी केला. “त्यांनी तर थेट रामाच्या आदर्शांनाच रस्त्यावर आणले आहे. मैदान मिळाले नाही तरी आम्ही झुकणार नाही, आम्ही थेट रस्त्यावर मंडप ठोकून आंदोलन करू!” असा कडक इशारा संजय राऊत यांनी यावेळी सरकारला दिला.

ताज्या बातम्या

पडसाद : आत्मविश्वास की वास्तवाशी फारकत?

0
नाशिक / शैलेंद्र तनपुरे - दै. देशदूत - संपादक बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, अशी एक आव्हान देणारी उक्ती मराठी भाषेत आहे....