Sunday, October 4, 2026
Homeराजकीयमोदी, शाहांचं नाव घेत संजय राऊतांचं मोठं भाकित; म्हणाले, 'जानेवारीपर्यंत तुम्हाला...'

मोदी, शाहांचं नाव घेत संजय राऊतांचं मोठं भाकित; म्हणाले, ‘जानेवारीपर्यंत तुम्हाला…’

मुंबई । Mumbai

“देशातील राजकीय वारे आता वेगाने बदलत असून जनता सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळली आहे. आगामी तीन महिन्यांत, म्हणजेच जानेवारीपर्यंत देशात आणि भाजपमध्ये अत्यंत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतील,” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “१७ सप्टेंबरनंतर देशातील राजकीय वातावरण वेगाने बदलू लागले आहे. सध्या राजकीय भूगर्भातील हालचाली तीव्र झाल्या असून त्याचे छोटे-मोठे धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल तीव्र असंतोष असून, येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना सत्ता सोडावी लागेल किंवा संपूर्ण सरकारच बदलावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.”

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत महाविकास आघाडीतर्फे एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले, “उद्या निघणाऱ्या या महामोर्चाच्या मार्गात थोडा बदल करण्यात आला आहे. आधी ठरलेला मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अडचणीचा ठरत असल्याने, आता हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयादरम्यान काढण्यात येईल.”

या मोर्चाला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) यांसह इतर मित्रपक्ष या आंदोलनात पूर्ण ताकदीने सहभागी होत आहेत. शिवसेना आणि मनसे एकत्र येत संपूर्ण महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या सकाळी ११ वाजता हा विराट मोर्चा निघणार असून, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली जाणार आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : ​भोंदू खरातच्या अडचणीत वाढ; दोषनिश्चितीचा टप्पा सुरु,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik दैवी शक्ती, भविष्यातील भीती आणि मंत्रोपचारांचा बनाव रचून महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याच्याविरुद्धच्या कायदेशीर...