Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयमिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?; वरळी अपघातावरुन राऊतांचा हल्लाबोल

मिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?; वरळी अपघातावरुन राऊतांचा हल्लाबोल

मुंबई । Mumbai

- Advertisement -

वरळीत रविवारी पहाटे झालेले ‘हिट अँड रन’चे (Worli Hit And Run) प्रकरण चांगलेच गाजत आहे. या अपघाताला ४८ तास उलटून गेले तरी मुख्य आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला शोधण्यात, अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

या सगळ्या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून एका महिलेचा नाहक जीव घेणाऱ्या त्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेवरुन शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnvis) लक्ष करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हे देखील वाचा : नाशिकच्या ‘त्या’ प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक; पोलिसांना दिले ‘हे’ निर्देश

संजय राऊत बोलताना म्हणाले की, वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी आणि त्याचे वडील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मला असं कळालं त्यांचे व्यावसायिक संबंधही आहेत. त्यांच्या पक्षाचे ते उपनेते आहेत. पोलिसांनी त्यांना अटक कशी केली. पोलिसांनी त्यांना अटक करुन मोठा गुन्हा केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला खून केल्यानंतर अटक कशी होऊ शकते. असा टोला राऊतांनी लगावला आहे.

मुख्य आरोपी कुठे आहे, फरार आहे ना त्यांचा मुलगा. एका मराठी महिलेला दारूच्या नशेत गाडीखाली चिरडून हा कोणी मिहीर शाह मुंबई पोलिसांच्या हातातून सुटतो कसा? कुठे गेलाय तो, सूरत की, गुवाहाटी? कुठे ठेवलंय त्याला सूरतला की, गुवाहाटीला लपवलंय? याचा खुलासा मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी करायला हवा, असे आव्हानही संजय राऊतांनी केले.

हे देखील वाचा : भाईगिरी करताे म्हणून काढला काटा

जवानांचे बलिदान नसून हत्या

जम्मू – काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर सोमवारी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले. मात्र, जवानांचे बलिदान नसून हत्या असल्याचे सांगत संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे वारंवार हल्ले होत आहेत. देशात भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकार आल्यापासून महिनाभरात दहशतवाद्यांचे सात हल्ले झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाही जम्मूमध्ये जवानांवर हल्ले झाले. त्यात जवान शहीदही झाले, असे संजय राऊत म्हणाले. अमित शहा यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री खोटे बोलून देशाला संभ्रमित करत आहेत. जम्मू काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात आहे. तिथे शांतता नांदत आहे, असे ते सांगतात. पण प्रत्यक्षात अनुच्छेद 370 हटविल्यानंतर जम्मूमध्ये अधिक अशांतता आणि अस्थिरता निर्माण झाली आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या