Tuesday, October 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: मोदींमध्ये दम असेल तर ट्रम्पला सुनावलं पाहीजे, चीनला दम…; संजय...

Sanjay Raut: मोदींमध्ये दम असेल तर ट्रम्पला सुनावलं पाहीजे, चीनला दम…; संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका

मुंबई | Mumbai
स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूर, सिंधू जल करार, पाकिस्तानची कारवाया, दहशतवादाच्या मुद्द्यावर परखडपणे भाष्य केले. १४० कोटी देशवासी आज तिरंग्याच्या रंगात रंगले आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच त्यांनी या भाषणात महत्त्वाची घोषणा केली. दरम्यान संजय राऊत यांनी मोदींच्या भाषणावर जोरदार टीका केली आहे. स्वदेशीचा नारा ही काँग्रेसची देणगी आहे असे राऊत म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
देशभरात तिरंगा फडकला आहे. पण देशात आजही कायदा-सुरक्षा, गरीबी, भूक यांची मोठी समस्या आहे. देशाचे स्वातंत्र्य 79 वर्षांचे झाले आहे. देश नक्कीच प्रगतीपथावर गेला आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात एक सुई आणि धागा ही मिळत नव्हता.आज तो देश अनेकबाबतीत पुढे गेला. त्याचे श्रेय या देशाचे नेतृत्व करणाऱ्या सर्वांनाच जाते. आज काही लोकांना वाटते की या देशाला २०१४ साली स्वातंत्र्य मिळाले. पण २०१४ नंतर देश स्वतंत्र झाला नाही तर खड्ड्यात गेला आहे. धार्मिक फूट ही देशाच्या स्वातंत्र्याला धोकादायक ठरत असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे.

- Advertisement -

प्रत्येक पंतप्रधानांनी काही ना काही योगदान दिले आहे. भाजपाचे योगदान इतकेच आहे मागच्या दहा वर्षात की आपला देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला. आपला देश धार्मिक होता, आपण भारतवर्ष असे म्हणतो. श्रद्धाळू आणि धार्मिक देशाला भाजपाने धर्मांध केले. ही धर्मांधता भारतात जातीय फूट पाडते आहे आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला धोकादायक आहे. असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

स्वदेशीचा नारा काँग्रेसची देण आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर बोलताना स्वदेशीचा नारा दिला. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आधी त्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी. स्वदेशीचा जो त्यांनी नारा दिला हा नारा म्हणजे काँग्रेस पक्षाची देणगी आहे. ते काँग्रेसने काय दिले असे विचारतात? स्वदेशीचा नारा या देशात काँग्रेस पक्षानेच दिला. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला. म्हणून तर देशात खादी आली, गांधी टोपी आली. एक दिवस नरेंद्र मोदी गांधी टोपी घालून भाषण करतील. मोदी आज काँग्रेसवाले झाले आहेत. नेहरूवादी आणि गांधीवादी झाले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

मोदींनी ट्रम्पला सुनावले पाहिजे आणि चीनला दम दिला पाहिजे
ज्यांनी देश घडवला, त्यांचेच, नेहरूंचेच नाव मोदी घेतात. ट्रम्प अथवा चीनविरोधात बोलण्याची हिम्मत मोदींमध्ये नाही असा टोला राऊतांनी हाणला. ट्रम्प रोज देशाला शिव्या घालतोय, मोदींना शिव्या घालतोय, त्याचे नाव घ्या. त्यांचे नाव घ्यायला घाबरत आहेत. पाकिस्तानला इशारा देणे, शिव्या देणे सोपे आहे. पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे, हे मोदी कसे विसरतात. लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटे भाषण करू नये, अशी टीका राऊतांनी केली. मोदींनी ट्रम्पला सुनावले पाहिजे आणि चीनला दम दिला पाहिजे असे राऊत म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

IND vs NZ : भारताला मालिका विजयाची संधी; ईशान किशन दुखापतीमुळे...

0
नवी दिल्ली | New Delhi भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (मंगळवारी)...