Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याविजय पचवायला शिकलं पाहिजे, अजीर्ण झालं की...; संजय राऊतांचा भाजपला टोला

विजय पचवायला शिकलं पाहिजे, अजीर्ण झालं की…; संजय राऊतांचा भाजपला टोला

मुंबई | Mumbai

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), गोवा (Goa), मणिपूर (Manipur) आणि पंजाब (Punjab) या पाच राज्यांची आज मतमोजणी होत आहे. लवकरच सर्व राज्यांचा निकाल स्पष्ट होईल…

- Advertisement -

या निवडणुकीत (Election) भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. ४ राज्यात भाजप आघाडीवर मात्र, पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) काँग्रेसला (Congress) हद्दपार केले आहे.

Visual Story : नवज्योत सिंग सिद्धूंचा पराभव करणाऱ्या ‘जीवनज्योत’ आहेत तरी कोण?

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भाजपचा भारी विजय आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. जे जिंकले आहेत त्यांचे अभिनंदन. मात्र उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लढाई अजून संपली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Punjab Election 2022 : पंजाबच्या निकालानंतर केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

विजय पचवायला शिकले पाहिजे, अजीर्ण झाले की त्रास होतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. भाजपने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्यात त्यापेक्षा कमी मत मिळालीत. विजय पचवायला शिकले पाहिजे, अजीर्ण झाले की त्रास होतो. सुडाने कारभार न करता लोकशाही पद्धतीने राज्य करा, असादेखील त्यांनी भाजपला दिला आहे.

योगी आदित्यनाथ यांचा दमदार ‘कमबॅक’; रचणार नवा इतिहास

- Advertisment -

ताज्या बातम्या