Friday, May 3, 2024
Homeनगरसंकेत नवले खून प्रकरणी दोघांना अटक

संकेत नवले खून प्रकरणी दोघांना अटक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक शास्त्राच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या अकोल्याच्या संकेत सुरेश नवले (Sanket Nawale) या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणाचा (Murder Case) तपास करण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. नाजूक कारणांमधून झालेल्या आर्थिक व्यवहारावरून हा खून (Murder) झाल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक (Arrested) केली आहे.

- Advertisement -

महापालिकेसमोर साकारणार छत्रपती शिवरायांचा पुतळा

संकेत नवले (Sanket Nawale) याचा खून (Murder) करून त्याचा मृतदेह संगमनेर (Sangamner) शहरातील पुनर्वसन कॉलनी परिसरातील नाटकी नाल्यात फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल (Filed a Case) केला होता. नाजूक कारणातून झालेल्या आर्थिक देवाण-घेवाणीतून दोघांनी त्याचा खून (Murder) करुन मृतदेह नाटकी नाल्याजवळ आणून टाकल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात हाती काहीच नसतांनाही संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने गेले दोन महिने मोठे परिश्रम घेत खुनाचा हा प्रकार उघड केला. पोलिसांनी आरोपी (Accused) न्यायालयात हजर केले असता एकाला पाच तर दुसर्‍या आरोपीला सहा दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.

अतिवृष्टीची मदत वितरीत करण्याचा जिल्हा प्रशासनाला विसर

गेल्यावर्षी 8 डिसेंबर रोजी संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याचा मृतदेह संगमनेरातील (Sangamner) सुकेवाडी रस्त्यावरील नाटकीनाल्याच्या बाजूला आढळून आला होता.शवविच्छेदनातून सदरील विद्यार्थ्याचा खून (Murder) झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. मात्र या घटनेनंतर मारेकर्‍यांनी मयत संकेतचा मोबाईलही नेल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता, घटनेच्या दिवशी (8 डिसेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास मयत संकेत सुरेश नवले (Sanket Nawale) हा विद्यार्थी नाटकीनाल्याच्या परिसरात स्वतः गेला होता.

शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या पगारात वाढ

तेथे त्याचा शाहरुख हसन शेख (वय 22) व सलमान इमाम शेख (वय 30) या दोघांशी संवाद झाला, त्यातूनच नाजुक संबंधातुनच जीवघेणा ठरला. या नाजुक संबंधातुनच त्यांच्यात शाब्दीक वाद झाले. या वादातून संतप्त झालेल्या त्या दोघांनी त्याच्या डोक्यात टणक वस्तु मारुन त्याला ठार केले, नंतर मोटारसायकलवरुन (Motorcycle) काही अंतरावर नेवून त्याचा मृतदेह नाटकीनाल्याच्या बाजूला फेकून दिला. पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola), अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्याचे सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे, संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पो. ना. अण्णासाहेब दातीर, अमित महाजन, पो. कॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, श्रीरामपूर सायबर विभागाचे पो. ना. फुरकान शेख यांनी हा गुन्हा उघड केला.

शिर्डी विमानतळावर नोकरी लावून देतो म्हणत 55 लाख रुपयांची फसवणूक

दरम्यान आमच्या मुलांना चौकशीच्या नावाखाली बोलावून विनाकारण या गुन्ह्यात अडकवले असल्याचा आरोप आरोपीच्या नातेवाईकांनी केला आहे. सकाळपासूनच त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला आहे. या अटकेच्या निषेधार्थ नातेवाईक पोलीस स्टेशनवर मोर्चा आणण्याच्या तयारीत होते. एवढा मोठा खुनाचा (Murder) गुन्हा उघड होऊनही पोलीस प्रसारमाध्यमांसमोर येऊन माहिती देत का नाही? हा ही एक मोठा संशोधनाचा विषय आहे. दरम्यान हेच खरे आरोपी (Accused) आहेत का याचाही तपास होणे गरजेच आहे. विनाकारण कोणालाही या गुन्ह्यात अडकू नये, अशी अपेक्षा आरोपीच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

उड्डाणपुलाच्या झगमगाटाचा बोजा मनपाच्या माथी

यानंतर दोन जणांच्या अटकेनंतर संगमनेरात (Sangamner) काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहर पोलिसांच्या चुकीच्या निर्णयावरून एक समाज एकवटला होता. दोनच्या सुमारास सर्वजण एका जागेवर जमा व्हा, अशी सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट व्हायरल होत होती मात्र हे आंदोलन हाताळण्यात पोलिसांना यश आलेले आहे.

आढळा नदीत वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला

ब्ल्युड, ग्रँडर, वल्ला या अ‍ॅप्सचा वापर करुन मयताने ज्या व्यक्तींना संपर्क केला त्या व्यक्तीं बाबत महिती घेण्यात आली मग आरोपी व मयत या दोघांचे धागेदोरे जुळवण्यात पोलिसांना यश आले. त्यातील काही अ‍ॅप समलैंगिक संदर्भाने असलेल्या वेबसाईट सी संबंधीत होते हा डेटा मिळाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेगळी कलाटणी मिळाली. यातूनच हे दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. अनेक दिवस उलटूनही पोलीस या खून प्रकरणातील आरोपींना अटक करू शकले नव्हते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. आरोपींनी कुठलाही पुरावा न ठेवल्याने पोलिसांना त्यांचा तपास लागत नव्हता.

- Advertisment -

ताज्या बातम्या