Monday, October 14, 2024
HomeनाशिकNashik News : संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परतली; ग्रामस्थांनी केले ...

Nashik News : संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये परतली; ग्रामस्थांनी केले स्वागत

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

४९ दिवसांचा पायी प्रवास करीत पंढरपूर वारी आटोपून श्री संत निवृत्तिनाथांची पालखी आज त्र्यंबकेश्वरमध्ये परतली. यावेळी संत निवृत्तिनाथ महाराज (Sant Nivrittinath Maharaj) स्वगृही परतल्याची भावना पालखी परतल्यानंतर निवृत्तीनाथ मंदिरामध्ये वारकऱ्यांनी (Warkari) दर्शन घेत व्यक्त केली. संत निवृत्तिनाथांच्या चांदीच्या रथामध्ये संत निवृत्तीनाथांची पालखी, प्रतिमा व पादुका होत्या. यावेळी स्थानिक वारकरी आणि भजन मंडळाने संत गजानन महाराज चौकात जाऊन टाळ मृदंग वाजवत अभंग म्हणत पालखीचे स्वागत केले. तर नगरीतील नाक्यावर नगरपालिका प्रशासक श्रिया देवचके यांनी पालखीचे स्वागत केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : गंगापूर धरणातून दुपारी तीन वाजता ‘इतक्या’ क्युसेकने पाण्याचा विसर्ग

यावेळी संत निवृत्तिनाथ मंदिर संस्थानच्या अध्यक्षा कांचनताई जगताप, विश्वस्त निलेश गाढवे, नारायण मुठाळ पालखीसोबत असलेले व मंदिराचे पुजारी जयंत महाराज गोसावी वारकरी पालखीसोबत होते. पांडुरंगाची भेट घेऊन संत निवृत्तिनाथांची पालखी त्र्यंबकेश्वरमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम त्र्यंबकराजाचे आणि संत निवृत्तिनाथांची भेट घडवण्यात आली. तर संत निवृत्तिनाथांच्या पादुका त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) नेण्यात आल्या. यावेळी मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग व कैलास घुले यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पालखीचे स्वागत केले. तसेच कुशावर्त चौक मार्गे पालखी संत निवृत्तिनाथ मंदिरात आल्यानंतर त्याठिकाणी वारकऱ्यांनी भजन कीर्तन केले. यावेळी पुरुष वारकऱ्यांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

हे देखील वाचा : इगतपुरीत भरदिवसा खून; भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावाने भावाला संपवलं

दरम्यान, पालखी संत निवृत्तीनाथ मंदिरात पोहचताच निवृत्तिनाथांचा जयघोष झाला. तर ट्रस्टच्या अध्यक्षा कांचनताई जगताप व नगरपालिका प्रशासक श्रिया देवचके यांची फुगडी देखील रंगली.तसेच इतर महिलाही फुगडी खेळत होत्या.तर पालखी परतताना बऱ्याच ठिकाणी मार्गावर पालखीला व वारकऱ्यांना खड्ड्यांचा सामना करावा लागला.याविषयी बोलतांना वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तर ट्रस्टकडून पालखी सोहळा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या