मुंबई । Mumbai
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठवाड्यातील राजकारण तापले आहे. या घटनेमुळे सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त दवस उलटले आहेत.
या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचेही आरोप आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे.
आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. कृष्णाच्या नावावर ५ वाहने तसंच धारूर आणि केजमध्ये बँक खाते आहेत. ही सर्व संपत्ती आता जप्त होणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कार्टाने दिले आहेत. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ६५ दिवसांनंतरही तो फरार आहे. आता त्याच्या मुसक्या आवळ्यासाठी कोर्टाने पाऊल उचलले आहे. कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
स्थानिक नागरिकांनी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोपीला पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे मारले, मात्र कृष्णा आंधळे हाताला लागत नाही.कृष्णा आंधळे च्या तपासासाठी तब्बल पाच पथके रवाना आहेत. कृष्णा आंधळे हा सराईत गुन्हेगार असून सुदर्शन घुले याच्यासोबत अनेक दिवसापासून सोबत आणि बऱ्याच गुन्ह्यांत सहभाग राहिला आहे.