Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनसिनेविश्वावर शोककळा! 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू

सिनेविश्वावर शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू

मुंबई | Mumbai

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या शोमध्ये ‘जास्मिन’ ची भूमिका करणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय (Vaibhavi Upadhyaya) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती ३२ वर्षांची होती. चंदिगड येथील त्यांचे कुटुंबीय त्यांचे पार्थिव मुंबईत आणत आहेत. वैभवी यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धक्कादायक! शूटिंग संपवून परतत असताना ट्रकने चिरडले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सीआयडी, अदालत आणि साराभाई वर्सेस साराभाई या लोकप्रिय मालिकांमध्ये तिनं आपली भूमिका बजावली आहे. साराभाई मालिकेतील जास्मीन या भूमिकेने वैभवीला विशेष ओळख निर्माण करुन दिली.

“मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार आहे…”; Twitterवरून दिली धमकी, यंत्रणा अलर्ट मोडवर

वैभवीने २०२० मध्ये ‘छपाक’ या चित्रपटातही काम केले होते. यावेळी ती प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणबरोबर झळकली होती. त्याबरोबरच तिने ‘तिमिर’ (२०२३) या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गुजराती कलाविश्वात तिचं मोठं नाव होतं. वैभवीने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या डिजीटल सीरिजमध्येही काम केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या