Saturday, September 5, 2026
Homeनगरसार्वमत शिलेदारांचा दिमाखदार सोहळ्यात सन्मान

सार्वमत शिलेदारांचा दिमाखदार सोहळ्यात सन्मान

अधिक जोमाने काम करण्यास ऊर्जा मिळाल्याची पुरस्कारार्थींची भावना

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

सायंकाळची प्रसन्न वेळ.. सूरमय संगीत.. आकर्षक विद्युत रोषणाई अन् गर्दीने भरलेले सभागृह.. फेट्यामध्ये मिरवणारे उल्हासी व रुबाबदार पुरस्कारार्थी.. पुरस्कारप्राप्त कार्यकर्तृत्ववान मान्यवरांचे मित्रमंडळी, नातेवाईकांचा अमाप उत्साह… पुरस्कार प्रदान केल्यानंतर टाळ्यांचा गजर… निमित्त होते दैनिक सार्वमत ‘शिलेदार लोकसेवक रयतेचे’ पुरस्कार सोहळ्याचे..! दैनिक सार्वमतच्या वतीने संगमनेर येथील वसंत लॉन्स येथे शनिवारी (दि.20) झालेल्या अत्यंत दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याप्रसंगी संगमनेरचे आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे, देशदूत-सार्वमत समूहाचे संचालक तथा सीएओ सुनील ठाकूर आणि संपादक अनंत पाटील या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाली. त्यानंतर शिलेदारांच्या कर्तृत्वाचा वेध घेणार्‍या पुरवणीचे प्रकाशन झाले. प्रास्ताविक करताना संपादक अनंत पाटील यांनी सार्वमतच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा उल्लेख करत गेली 50 वर्षे ‘सार्वमत’ने अहिल्यानगर जिल्ह्याच्या मातीत केवळ वृत्तपत्र म्हणून नव्हे, तर एक भक्कम वैचारिक व्यासपीठ म्हणून काम केले आहे, असे स्पष्ट केले. जिल्ह्यातील पाण्याचे आंदोलन, रस्त्यांचे प्रश्न, विजेचा लढा, जमिनीचे व रेल्वेचे प्रश्न, तसेच शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत हक्कांसाठी सार्वमतने नेहमीच चळवळींना बळ दिल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बेलापूर (ता.श्रीरामपूर) येथील युवा नेतृत्व अभिषेक खंडागळे, बेलपिंपळगाव (ता.नेवासा) येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अमोल कोकणे, आश्वी बुद्रुक जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या कांचनताई मांढरे, नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, बेलापूरचे अश्वमित्र कनजीशेठ टाक, कुकाणा (ता.नेवासा) येथील उद्योजिका तस्मिया शेख, भोकर (ता.श्रीरामपूर) येथील उपसरपंच गणेश छल्लारे, खुपटी (ता.नेवासा) येथील सरपंच राजश्रीताई तनपुरे व गोरक्षनाथ तनपुरे, आश्वी (ता.संगमनेर) येथील भाजप मंडल अध्यक्ष गोकुळ दिघे, शिर्डीचे सेवाभावी व्यक्तिमत्त्व गोपीनाथ गोंदकर, राहाता पंचायत समितीचे उपसभापती दीपक तुरकणे, दुर्गापूर (ता.राहाता) येथील सरपंच नानासाहेब पुलाटे, पिंपळस (ता.राहाता) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन कापसे, नांदुर्खी (ता.राहाता) येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब चौधरी, बेल्हेकरवाडीचे माजी सरपंच भरत बेल्हेकर, पिंपरी निर्मळ (ता.राहाता) येथील जनसामान्यांचे जनसेवक महेश वाघे, टाकळीभान (ता.श्रीरामपूर) येथील युवा नेतृत्व मयूर पटारे, कोळेवाडी (ता.राहुरी) येथील सामाजिक कार्यकर्त्या रोहिणीताई आंबेकर, सोनारी (ता.कोपरगाव) येथील यशस्वी उद्योजक राजेंद्र सांगळे, वीरगाव (ता.अकोले) येथील युवा नेतृत्व वाल्मिक देशमुख, कणकुरी (ता.राहाता) येथील जनसेवक विठ्ठल पवार, राहात्याचे उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, श्रीरामपूर येथील ज्ञानदूत संजय जोशी, मुकिंदपूर (ता.नेवासा) येथील सरपंच सतीष निपुंगे, पुनतगाव (ता.नेवासा) येथील सरपंच सुदर्शन वाकचौरे, कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे पाटील, वेल्हाळे (ता.संगमनेर) येथील उपसरपंच सोमनाथ सोनवणे, गोगलगाव (ता.नेवासा) येथील माजी सरपंच योगेश म्हस्के, डोंगरगाव (ता.अकोले) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील उगले या शिलेदारांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणार्‍या व्यक्तींच्या योगदानाला सलाम करणारा हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यानंतर दैनिक सार्वमतने केलेल्या गौरवामुळे पुढील काळात आणखी जोमाने काम करण्यास ऊर्जा मिळाल्याची भावना पुरस्कारार्थी मान्यवरांनी व्यक्त केली. शेवटी जाहिरात व्यवस्थापक अश्विन मुथा यांनी आभार मानले. या कार्यक्रमास शिलेदारांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, वाचक, देशदूत-सार्वमत परिवारातील सहकारी उपस्थित होते.

सार्वमतच्या पुरस्कारामुळे आणखी उर्जा मिळेल – आ. खताळ
‘सार्वमत’ने नेहमीच तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि कामाला हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे, अशा शब्दांत आ. खताळ यांनी गौरव केला. मी आयुष्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरपालिका अशी कोणतीही निवडणूक लढवली नव्हती. परंतु, जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने आणि ‘सार्वमत’सारख्या दैनिकांच्या खंबीर पाठबळामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ताही आमदार म्हणून पुढे जाऊ शकलो, शेती, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा गौरव करण्याच्या ‘सार्वमत’च्या उपक्रमाचे कौतुक करताना ते म्हणाले, केलेल्या कामाचा सन्मान झाल्यामुळे पुढील कामासाठी मोठी ऊर्जा मिळते. ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षांपर्यंत सर्वांनाच अशा पुरस्कारांमुळे अधिक काम करण्याचे प्रोत्साहन मिळते.

सार्वमत शिलेदार पुरस्कार प्रेरणादायी – आ.तांबे
सार्वमत आणि अहिल्यानगर जिल्हा यांचे एक वेगळेच नाते आहे. सकाळी ‘सार्वमत’ वाचल्याशिवाय लोक आपले मत तयार करत नाहीत, इतकी या वृत्तपत्राची ताकद आहे असा आमदार सत्यजीत तांबे यांनी गौरव करतानाच, सार्वमतने दिलेले शिलेदार पुरस्कार प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट केले. आज ज्या शिलेदारांना ग्रामीण विकासातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले आहे, त्यांच्यासाठी हा पुरस्कार म्हणजे आयुष्यातील ‘फूलस्टॉप’ नसून ‘कॉमा’ आहे. या पुरस्कारामुळे तुमची समाजाप्रती असणारी जबाबदारी अधिक वाढली असून, भविष्यात अधिक व्यापक काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोणत्याही पुरस्कारानंतर समाजाचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्यामुळे आता अधिक जबाबदारीने काम करावे लागेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

खुशी हाच माझा स्वभाव; देण्यातच आनंदाचा खरा पासवर्ड – राजयोगी ब्रह्माकुमार...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik खुशी हाच माझा स्वभाव आणि धर्म आहे. जीवनातील प्रत्येक कर्म आनंदाने केले पाहिजे. केवळ मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा इतरांना देण्याची वृत्ती आत्मसात...