श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
दैनिक सार्वमत शॉपिंग एस्पो 2025 महोत्सवाचा शुभारंभ उद्या गुरुवार दि. 30 जानेवारी रोजी येथील थत्ते मैदानावर सायंकाळी 5 वाजता विविध मान्यवरांंच्या प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे. दै. सार्वमत सलग पाचव्यांदा श्रीरामपूर येथे भव्य शॉपिंग महोत्सवाचे आयोजन करत असून या महोत्सवासाठीं सहप्रायोजक म्हणून वासन टोयोटा व साई आदर्श मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी, यांचे सहकार्य लाभले आहे. या महोत्सवासाठी कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.
श्रीरामपूरकरांना दै. सार्वमत शॉपींग महोत्सवाच्या निमित्ताने उद्या दि. 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2025 या दरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा महोत्सव ग्राहकांसाठी खुला असणार आहे. या शपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तू, विविध उपकरणे, विविध औषधे तसेच टु व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्या वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंतचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी केली जाणार आहे. सर्व ग्राहकांना खरेदी बरोबरच विविध खाद्यपदार्थांचा आस्वादही याठिकाणी घेता येणार आहे.
खरेदी वस्तू, खाद्यपदार्थ याबरोबरच विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही याठिकाणी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत संपन्न होणार आहेत. या महोत्सवाचा उद्या दि. 30 जानेवारी रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ होत आहे. मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये दि. 31 जानेवारी रोजी सायंकाळी 1 ली ते 7 वी. पर्यंतच्या मुलां-मुलींचे सोलो डान्स, दि. 1 फेब्रुवारी रोजी खास महिलांकरिता अँकर प्रवीण प्रस्तुत खेळ पैठणीचा तर दि.2 फेब्रुवारी रोजी खुल्या गटातील मुला-मुलींचे सोलो डान्स होणार असून यामध्ये स्थानिक कलाकारांचा कलाविष्कार पहायला मिळणार आहे. शेवटच्या दिवशी दि. 3 फेब्रुवारी रोजी पुन्हा खास महिलांकरिता ङ्गखेळ पैठणीचाफ मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. दि. 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2025 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या दै. सार्वमत शॉपिंग एस्पो 2025 चा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाव नोंदणीचे आवाहन
या खरेदी महोत्सवानिमित्त दि. 31 जानेवारी व दि. 2 फेब्रुवारी रोजी आयोजित सोलो डान्स साठी स्थानिक हौसी कलाकारांनी सार्वमत कार्यालयात नावनोंदणी करावी. दोन्ही कार्यक्रमासाठी प्रथम नोंदणी करणार्या मर्यादित कलाकारांना संधी दिली जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐनवेळी येणार्यास संधी दिली जाणार नाही. त्यामुळे आपली नावनोंदणी आजच करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.