Saturday, April 4, 2026
Homeनगरसार्वमत शॉपिंग एक्स्पोचा श्रीरामपुरात उद्या भव्य शुभारंभ

सार्वमत शॉपिंग एक्स्पोचा श्रीरामपुरात उद्या भव्य शुभारंभ

विविध वस्तूंच्या खरेदीबरोबरच चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद अन् जोडीला मनोरंजनाचा धमाका

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूरकर आतुरतेने वाट पहात असलेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2026 महोत्सवाचा शुभारंभ उद्या दि. 12 रोजी सायंकाळी 5 वाजता येथील थत्ते मैदानावर विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या शॉपिंग एक्स्पोचे मुख्य प्रायोजक श्री इंम्पेक्स द फर्निचर मॉल असून सहप्रायोजक म्हणून साई आदर्श पतसंस्था यांचे सहकार्य लाभले आहे. या महोत्सवासाठी ग्राहकांना कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही.

- Advertisement -

दैनिक सार्वमत गेल्या 6 वर्षापासून दरवर्षी शॉपिंग एक्स्पोचे आयोजन करत असून ग्राहकांचा प्रचंड प्रतिसादही मिळत असतो. याहीवर्षी दि. 12 फेबु्रवारी ते दि. 16 फेब्रुवारी या कालावधीत सार्वमत शॉपिंग एक्स्पोचे आयोजन केलेले असून यामध्ये ग्राहकांना खरेदीची पर्वणी साधता येणार आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतानाच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचाही लाभ सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत घेता येणार आहे.

शॉपिंग एक्स्पोचे 2026 सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे. या शॉपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तु, विविध उपकरणे, विविध औषधे, फॅशनेबल ड्रेसेस, साड्या, महिलांसाठी विविध प्रकारची आकर्षक ज्वेलरी डिझाईन तसेच महिलांसाठी विविध सौंदर्य प्रसाधने तसेच टू व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्यात छोट्या वस्तूंपासून मोठ्यात मोठ्या वस्तूंपर्यंतचे तसेच लहान मुलांपासून तरुण व वृध्द व्यक्तींना उपयुक्त असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी उपलब्ध असणार आहे.

शॉपिंग एक्स्पोमध्ये दररोज भेटी दिलेल्या ग्राहकांनी कुपन भरुन त्याठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये ते कुपन टाकायचे आहे. दिवसभरातील जमा झालेल्या कुपनांपैकी यातून 3 भाग्यवान ग्राहकांचे कुपन सोडत काढली जाणार असून दररोज तीन भाग्यवंतांना आकर्षक बक्षिस दिले जाणार आहे. तरी ग्राहकांनी या शॉपींग महोत्सवास भेट देवून मनमुराद खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोलो, ग्रुप डान्स व खेळ पैठणीचा
मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सोलो डान्स, शनिवार दि. 14 फेब्रुवारी रोजी ग्रुप डान्स तसेच रविवार दि. 15 फेब्रुवारी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत खास महिलांकरिता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नामवंत कलाकारांचा अविष्कार असलेल्या ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले आहे.

नाव नोंदणी करण्याचे आवाहन
दि. 13 फेब्रुवारी रोजी होणार्‍या सोलो डान्ससाठी तसेच दि. 14 फेब्रुवारी रोजी होणार्‍या ग्रुप डान्ससाठी स्थानिक हौसी कलाकारांनी दैनिक सार्वमत श्रीरामपूर कार्यालयात नावनोंदणी करावी. प्रवेश संख्या मर्यादित असल्याने नावनोंदणी अनिवार्य आहे.

ताज्या बातम्या

Nashik Dindori Accident News : मंत्री महाजन, भुसे, झिरवाळ यांच्यासह खासदार...

0
दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori दिंडोरी येथील विहीरीत (Well) पडून नऊ जण मृत्यूमुखी पडले. त्यानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)...