Thursday, May 2, 2024
Homeजळगावरॅलीद्वारे वाघ वाचवाचा संदेश

रॅलीद्वारे वाघ वाचवाचा संदेश

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील मुक्ताई-भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्र (Muktai-Bhavani Tiger Reserve) नुकतेच शासनाने अभयारण्य (Sanctuary) म्हणून जाहीर केले आहे. या क्षेत्रात नऊ वाघांचा समृध्द संचार (rich communication of tigers) आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळणे, आणि व्याघ्र संवर्धनासाठी (tiger conservation) जळगाव वनविभाग व वन्यजीव संरक्षण संस्थेकडून (Jalgaon Forest Department and Wildlife Conservation Society)जागतिक व्याघ्र दिनाच्या (World Tiger Day) पार्श्वभूमीवर या भागातील ग्रामस्थांमध्ये जनजागृतीसाठी काढण्यात येणारी मोटारसायकल रॅली (Motorcycle Rally) गुरुवारी दुपारी मुक्ताई-भवानी अभयारण्याकडे रवाना झाली.वाघ वाचवा या विषयावर जनजागृती करण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विशाल भोळे, वन्यजीव संसंस्थेचे रवींद्र सोनवणे,रवींद्र फालक, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, टायगर कॉन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर मुंबई चे प्रसाद हिरे, स्टँडिंग फॉर टायगर फौंडेशन चे रवींद्र मोहोड, राजेंद्र नन्नवरे, अभय उजागरे, चंद्रशेखर नेवे यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात करण्यात आली. मान्यवरांनी रॅलीस शुभेच्छा दिल्यात. प्रास्तविक बाळकृष्ण देवरे तर आभार योगेश गालफाडे यांनी केले.

रॅलीच्या यशस्वीते साठी सैयोजक विवेक होशिंग, मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, निलेश ढाके, राहुल सोनवणे, ऋषी राजपूत, वासुदेव वाढे, विजय रायपुरे, अलेक्स प्रेसडी, अमन गुजर, रवींद्र सपकाळे, रवींद्र सोनवणे, अजीम काझी, प्रदीप शेळके, विनोद सोनवणे, भूषण चौधरी, ललित शिरसाठे, बबलू शिंदे, हेमराज सोनवणे, विनोद ढगे, दुर्गेश आंबेकर, परिश्रम घेत आहेत.

वाघांची वेशभूषा, मुखवटे घातलेले व्याघ्रदूतांनी वेधले लक्ष

वाघांची वेशभूषा आणि मुखवटे घातलेले व्याघ्र दूत, रेस्क्यू वाहन, विनोद ढगे यांचे करू या वाघाचे रक्षण पथनाट्य, मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची माहितीसह वाघ वाचवा चा संदेश देत रॅली दुपारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातून मुक्ताई-भवानी अभयारण्याकडे रवाना झाली.

जळगांव, धुळे, नंदुरबार, नासिक, ठाणे, वाशीम, शिर्डी , मेळघाट, दिल्ली येथून सुमारे 150 व्याघ्र दूत या महा रॅलीत सहभागी झाले आहेत . दि.29 जुलै जागतिक व्याघ्र दिनी डोलारखेडा, चारठाणा, वायला दुई, सुकळी, राजुरा, आणि परिसरातील गावात पथनाट्य सादर करत मानव वन्यजीव संघर्ष बचाव , आणि वाघ वाचवा या विषयावर जनजागृती करण्यात येणार आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या