नवीन नाशिक। प्रतिनिधी New Nashik
कामटवाडे परिसरातील अंबिकानगर परिसरात नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबड या पक्ष्याची सामाजिक कार्यकर्ते सुशील नाईक यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने सुटका केली.
- Advertisement -
आज दुपारच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुशील नाईक यांना कामटवाडे परिसरातील अंबिकानगर परिसरातून जात असताना एका झाडाजवळ नायलॉन मांजामध्ये एक पक्षी अडकल्याचे निदर्शनास आले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
यावेळी नाईक यांनी अग्निशमन दलाला कळवले. यावेळी अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबड पक्ष्याला जीवदान दिले.