Tuesday, September 15, 2026
HomeराजकीयSayaji Shinde : …म्हणून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं; प्रसिद्ध अभिनेत्याचं रोखठोक वक्तव्य

Sayaji Shinde : …म्हणून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं; प्रसिद्ध अभिनेत्याचं रोखठोक वक्तव्य

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील विलीनीकरणाच्या चर्चांना मोठे उधाण आले आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते सयाजी शिंदे यांनी या विषयावर अत्यंत महत्त्वाचे आणि भावनिक भाष्य केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आता हेवेदावे सोडून एकत्र यावे आणि ‘दादांची’ (अजित पवार) ही शेवटची इच्छा पूर्ण करावी, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.

सयाजी शिंदे यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. “महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती, असेही संकेत त्यांनी दिले. निवडणुकीच्या काळात विलीनीकरणाच्या हालचाली सुरू असताना अचानक काहीतरी वेगळे घडणे हे राज्याच्या राजकीय स्थिरतेच्या दृष्टीने खेदजनक असल्याचे मत शिंदे यांनी यावेळी मांडले.

पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्यासाठी दोन्ही गटांचे मनोमिलन होणे आवश्यक असल्याचे सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केले. “जर राष्ट्रवादीला पुन्हा एकदा मोठी ताकद म्हणून उभं राहायचं असेल, तर एकीशिवाय पर्याय नाही,” असे ते म्हणाले. दादांच्या स्वप्नांचा आणि राज्याच्या हिताचा विचार करून वरिष्ठ नेत्यांनी यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

पुणे आणि बारामतीमधील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आणि राजकीय फेररचनेच्या काळात, विलीनीकरणाचा हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सयाजी शिंदे यांनी थेट ‘विलीनीकरणा’चा शब्द उच्चारल्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार गटातील इतर दिग्गज नेते यावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar चार महिन्यांपासून प्रशासक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम...