Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी कधी?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी कधी?

दिल्ली | Delhi

- Advertisement -

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे आज अनुपस्थित राहिल्यानं सुनावणी होऊ शकली नाही. ही सुनावणी आता मंगळवार, २८ मार्च रोजी होणार आहे.

९२ नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका (Election) या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. गेल्या तारखेच्या वेळी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरू होती.

मुंबईसह राज्यभरात अवकाळी सरी! पुढील ३ ते ४ तासांत जोर आणखी वाढणार

गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २१ मार्च रोजी न्यायालयात राज्य सरकार काय भूमिका घेणार यावर फैसला होणार होता. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

PHOTO : बाबासाहेबांचे हे दुर्मिळ फोटो तुम्ही पाहिलेत का?

दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सुनावणी झाली असती तर, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबतचे चित्र देखील लगेच स्पष्ट झाले असते .

भीषण अपघात! भरधाव कार ट्रकला धडकली, तिघे जागीच ठार

- Advertisment -

ताज्या बातम्या