Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशालेय विद्यार्थ्यांनी बनविले सौर उर्जेवर चालणारे 'कांदा पात कापणी यंत्र'

शालेय विद्यार्थ्यांनी बनविले सौर उर्जेवर चालणारे ‘कांदा पात कापणी यंत्र’

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात कांद्याचं मोठं लागवड क्षेत्र असल्याने शेतकर्‍यांना कांदा काढणीनंतर कांदा आणि पात वेगळी करण्यासाठी मजुरांचा अभाव ही गोष्ट हेरून निफाड तालुयातील गोंदेगाव येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, संचालित माध्यमिक विद्यामंदिर दहावीतील विद्यार्थी सुमित संभाजी शिंदे आणि ओम आनंदा घुगे यांनी सौर ऊर्जेवर चालणार्‍या ‘कांदा पात कापणी यंत्र’ तयार केले. त्याची इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामधून जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर निवड झाली आहे.

YouTube video player

विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल गोंदेगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक दत्ता कुटे यांचा माजी आमदार नरेंद्र दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सोनिया होळकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, कृषी तज्ज्ञ सचिन होळकर, गोंदेगाव सोसायटी व्हा. चेअरमन डॉ.विलास कांगणे, सचिन दरेकर, योगेश पाटील आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महेश मेथे, शांताराम कांगणे, रज्जाक पठाण, शब्बीर पठाण, यासीन पठाण, सुधाकर कांगणे, भाऊसाहेब कांगणे, पोपट कांगणे, भगीरथ कांगणे, रावबा साळवे, प्रकाश भोसले, शरद फापाळे, वाल्मीक सांगळे, हरिभाऊ सांगळे, अरुण साळवे, रशीद शेख, पोपट मोरे, विष्णु कांगणे, शिवाजी शिंदे, संभाजी शिंदे, विश्वनाथ कांगणे, म्हाळू बस्ते, देविदास दिघे, ग्रामसेवक अमोल भारती, सचिव रामा साळवे, वाल्मीक ताडगे, ज्ञानेश्वर वैद्य, शालेय समिती अध्यक्ष दत्तात्रय साळवे, मुख्याध्यापक अलगट आदींसह शिक्षक व सेवक उपस्थित होते.

या यंत्रासाठी ४० वेट सौर ऊर्जा पॅनल, दोन चाकूचे पाते, १२ व्होल्ड ची मोटर, लोखंडी ब्रॅकेट असे ३५०० रु. किमतीच्या साहित्याचा वापर करत सौर ऊर्जा कांदा व पात कापणी यंत्र तयार केले. कांदा कापणी करताना दुखापत होऊ नये यासाठी सेन्सरचा केला जाणार वापर, कापणी केलेला कांदा ट्रॉली किंवा गोणीमध्ये भरण्यासाठीचा पर्याय, तसेच कांदा कापणीनंतर कांद्याची प्रतवारी करण्यासाठीची सुविधा करणार आहे.

गोंदेगाव येथे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, संचालित माध्यमिक विद्यामंदिर ही आमची शाळा असून दहावीतील विद्यार्थ्यांनी कांदा व पात वेगळी करण्यासाठी यंत्र बनवायची कल्पना सांगितली असता हे यंत्र बनवताना विजेची जाणवणारी समस्या यावर सौर उर्जेवर चालणारा यंत्र कसा तयार करावा, यासाठी मी त्यांना मार्गदर्शन केले आणि हे यंत्र तयार झाले असून याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. या यंत्राला अवघा ३५०० रु. इतका खर्च आला. यामध्ये आणखी बदल करत हे यंत्र राज्यस्तरावर याची निवड होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.
दत्ता कुटे, सौरऊर्जा कांदा कापणी यंत्र मार्गदर्शक शिक्षक, गोंदेगाव

गोंदेगावसारख्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती समस्यांवरील नाविन्यपूर्ण उपाय शोधला आहे. विद्यार्थ्यांची ही कामगिरी केवळ विद्यालयाची मान उंचावणारी नसून ग्रामीण भागातील विज्ञान निष्ठतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरणारी आहे.
नरेंद्र दराडे, माजी आमदार

कांदा काढणीनंतर मजुरांचा असलेला अभाव यामुळे कांदा आणि पात वेगळी करण्यासाठी जास्त मजुरी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत असल्याने ही बाब हेरून हे यंत्र बनवण्याची कल्पना मनात आली. यासाठी माझा मित्र ओम घुगे याला सोबत घेत आमचे शिक्षक दत्ता कुटे यांना सांगितले असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सौरऊर्जा कांदा कापणी यंत्राची आम्ही निर्मिती केली आणि जिल्हास्तरावर इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनामधून भाग घेतला. जिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर निवड झाली आहे.
सुमित शिंदे, कांदा कापणी यंत्र बनवणारे विद्यार्थी

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...