Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याशहरालगतच्या १५ किलोमीटर परिसरातील सर्व शाळा १५ मार्चपर्यंत बंद

शहरालगतच्या १५ किलोमीटर परिसरातील सर्व शाळा १५ मार्चपर्यंत बंद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कोविड -१९ च्या वाढत्या प्रमाणामुळे नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय व खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यानंतर आता नाशिक शहरालगतच्या 15 किलो मिटरच्या परिसरातील सर्वच शाळा देखील 15 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामध्ये नाशिक तालुक्यासह सिन्नर, दिंडोरी, निफाड या तालुक्यातील 98 शाळांचा समावेश आहे.

- Advertisement -

इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा 50 टक्के उपस्थितीच्या प्रमाणात सुरु होत्या. करोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन या शाळा बंद करण्याचा निर्णय नाशिक महापालिका आयुक्तांनी घेतला.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी व विज्ञान विषयाचे वर्ग भरवण्यास परवानगी आहे. उर्वरीत सर्व विषय ऑनलाईन शिकविले जातील.त्याच धर्तिवर आता शहरापासून 15 किलो मिटरच्या अंतरापर्यंतच्या शाळा बंद करण्यात येणार आहेत.

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी व विज्ञान विषयासाठी शाळेत यावे लागेल. उर्वरीत सर्व विषय हे ऑनलाईन शिकवले जाणार आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव होत असल्याने या शाळांबाबतही येत्या काही दिवसांमध्ये निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते. शिक्षक संघटनाही शाळा बंद करण्यासाठी आग्रही आहेत.

जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने शहरालगतच्या शाळा बंद केल्या आहेत. ग्रामीण भागातील शाळांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

-वैशाली झनकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

तालुकानिहाय बंद शाळा

नाशिक -65

दिंडोरी-17

सिन्नर-12

निफाड-4

एकूण-98

- Advertisment -

ताज्या बातम्या