Thursday, March 13, 2025
Homeनगरमाध्यमिक शिक्षक सोसायटीचा बिगुल वाजला

माध्यमिक शिक्षक सोसायटीचा बिगुल वाजला

शिक्षकांचे राजकारण तापणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील सुमारे दहा हजार माध्यमिक शिक्षकांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणार्‍या अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेची निवडणूक सहकार खात्याने जाहीर केली आहे. त्यानुसार शिक्षक सोसायटीसाठी येत्या 23 मार्चला मतदान होणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी आज 14 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून यासाठी 21 फेब्रुवारी ही शेवटची मुदत देण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी दाखल अर्जांची दररोज सूची तयार करण्यात येणार असून 24 फेब्रुवारीला दाखल अर्जांची छाननी होऊन 25 तारखेला वैध नामनिर्देशन पत्राची (अर्जाची) यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

- Advertisement -

25 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. 12 मार्चला निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी व त्यांचे निवडणूक चिन्ह प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षक सोसायटीसाठी निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. त्यानंतर 24 मार्चला मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सांगण्यात आले.

मतमोजणी झाल्यानंतर लगेचच निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे. या निवडणुकीत जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी मंगळवार दि. 4 फेबु्रवारी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. सोसायटीसाठी 9 हजार 152 मतदार पात्र आहेत. यात सोसायटी मुख्यालयात नगर शहर 875, नगर तालुका 767, जामखेड 107, पारनेर 48 आणि श्रीगोंदा 81 असे 1 हजार 878 सभासद आहेत. यासह पारनेर 581, श्रीगोंदा 439, कर्जत 330, पाथर्डी 911, शेवगाव 664, नेवासा 9 असे एकत्र असून पुन्हा नेवासा 655, श्रीरामपूर 505, राहुरी 670, कोपरगाव 342, संगमनेर 1 हजार 11, नाशिक 34, अकाले 906 आणि राहाता 219 असे मतदार आहेत.

प्रा. कचरे पुन्हा केंद्रबिंदू
गेल्या 20 ते 25 वर्षापासून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या राजकारणात प्रा. भाऊसाहेब कचरे हे केंद्रस्थानी आहेत. गेल्या चार ते पाच पंचवार्षिकपासून प्रा. कचरे यांच्या मंडळाचे माध्यमिक शिक्षक सोसायटीवर वर्चस्व राहिलेले आहे. गत पंचवार्षिकला शिक्षक सभासदांनी विरोधी गटाच्या पाच संचालकांना विजयी केले. मात्र, माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चाव्या या खर्‍याअर्थाने प्रा. कचरे यांच्या ताब्यात ठेवलेल्या आहेत. यंदा देखील सोसायटीमधील सत्ताधारी मंडळ प्रा. कचरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला समोरे जाणार असून या संस्थेवर कोणाचा झेंडा कायम राहणार हे 24 मार्चला कळणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...