Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारराष्ट्रीय बालस्वास्थ्य सुरक्षा पथकामार्फत गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी

राष्ट्रीय बालस्वास्थ्य सुरक्षा पथकामार्फत गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी

तळोदा । Taloda। ता.प्र.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (National Rural Health Mission) अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा पथकामार्फत (National Child Health Protection Squad) सन 2021-22 या कोविड संक्रमण कालावधीत येथील प्रथक क्रमांक 1 ने 0 ते 18 वयोगटातील अंगणवाडी व शाळातील बालकांची व विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी (Student health check) पूर्ण केली. पथकातील डॉ. वर्षा सुळे आरोग्य सेविका मंगला वळवी, औषध निर्माण अधिकारी कमलेश बिरारे यांनी या वर्षातील आरोग्य तपासणीत अनेक गंभीर शस्त्रक्रिया (Serious surgery) रुग्ण शोधून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले.

- Advertisement -

सदर शस्त्रक्रियेत तळोदा तालुक्यातील अंजली नितीन पाडवी, नैतिक अमर नाईक, दर्श दयानंद वळवी, माहेश्वरी उदेसिंग पावरा , अहिल हिम्मत पावरा (हृदरोग) यांच्यावर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथक तळोदा 1 मार्फत मुंबई, ठाणे, नाशिक, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

अंजली नितीन पाडवी सोमावल बु. सदर विद्यार्थिनीस लहानपणापासून पोटावर अतिशय मोठी गाठ होती त्यासमवेतच आरोग्य तपासणीत तिला हृदयरोग आढळून आला. त्यामुळे सदर मुलीस चालणे, बसणे अवघड होत असे ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची होती. परंतु उपजिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी रणजित कुर्हे, वाडिया हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. संजय प्रभू व त्यांचे कर्मचारी, युनिसेफचे पोषण आहार सल्लागार डॉ. सुनील लोखंडे, सोमावलचे सरपंच यशवंत पाडवी, सदर पथकाच्या डॉ. वर्षा सुळे, आरोग्य सेविका मंगला वळवी, औषध निर्माण अधिकारी बिरारे या सर्वांच्या सहकार्य, उत्तम मार्गदर्शन व पाठपुराव्याने तिच्यावर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कमीत कमी एक महिन्याच्या रुग्णालयीन वास्तव्याने मनोधैर्य खचलेल्या या रुग्णाचे मनोबल तेथील डॉक्टर व कर्मचार्‍यांनी उत्तम राखले. शस्त्रक्रियेनंतर तिच्या पालकांच्या डोळ्यातील आनंदाश्रू ने समस्थ ग्रामस्थ व परिवारास आनंद झाला. सदर शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकास एक सुवर्णपंख प्राप्त झाल्यासारखी आहे. यासमवेत अनेक हृदयरोग व इतर गंभीर आजारांची शोध मोहीम व पाठपुरावा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य सुरक्षा पथक तळोदा मार्फत चालू आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या