Friday, May 3, 2024
Homeनाशिकबुधवार ठरला ‘आत्महत्या’ वार; विविध भागात सात जणांनी कवटाळले मृत्यूला

बुधवार ठरला ‘आत्महत्या’ वार; विविध भागात सात जणांनी कवटाळले मृत्यूला

नाशिक | प्रतिनिधी

शहर परिसरात बुधवारी वेगवेगळ्या सात जणांनी आत्महत्या करून जीवन संपविले. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांनी नाशिक शहर हादरले असून बुधवार ‘आत्महत्या’ वार ठरला. एकाने विषारी औषध सेवन करून तर अन्य सहा जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलासह युवतीचा समावेश आहे…

- Advertisement -

सिडकोतील आैदूंबर बस थांबा भागात राहणाऱ्या इश्वर भगवान वाडीले (४७) यांनी बुधवारी घरी विषारी औषध सेवन केले. ही बाब निदर्शनास येताच त्यांना तत्काळ लेखानगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. औषोधोपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना औद्योगिक वसाहतीत घडली. सिध्दांत दीपक गायकवाड (१७ रा. धनराज रेसि. अंबड वजन काट्याजवळ) याने मंगळवारी (दि. २३) मध्यरात्री बेडरूममध्ये गळफास लावून घेतला.

कुटूंबियांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. तिसरी घटना चुंचाळे शिवारात घडली. मोहन राजकुमार यादव (४० रा. घरकुल योजना, चुंचाळे) यांनी बुधवारी सकाळी घरात गळफास लावून घेतला.

त्यात त्याचा मृत्यू झाला. तर लेखानगर येथील शॉपिंग सेंटर भागात राहणारे भूषण राजेंद्र पवार (३० रा. खंडेराव चौक) यांनी मंगळवारी (दि. २३) रात्री घरातील हॉलमध्ये छताच्या कडीला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. कुटूंबियांनी त्यास तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून वरील घटनाक्रमानुसार तपास हवालदार शेख, जमादार जाधव, शेळके व शेख करत आहेत. तसेच पेठरोडवरील यजुर्वेदनगरी भागात राहणाऱ्या गौरी सोमनाथ पवार (२२ रा. मेघराज बेकरी समोर) हिने बुधवारी घरात गळफास लावून आत्महत्या केली.

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास हवालदार पवार करत आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या रोशन कौतिक काळे (३१ रा. शिवनेरी बंगला) यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास किचनमध्ये गळाफास लावून आत्महत्या केली. पत्नी मोनाली काळे यांच्या माहितीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास पोलीस नाईक चौधरी करत आहेत.

तर शिंदे गावातील नायगावरोड भागात राहणाऱ्या विशाल चंद्रभान माळी (२२ रा. इंदिरानगर) या युवकाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी भाऊ सागर माळी यांनी दिलेल्या माहितीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास पाेलीस हवालदार गांगुर्डे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या