Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यागोदावरीत सांडपाणी; मनपा प्रशासन लक्ष देणार का?

गोदावरीत सांडपाणी; मनपा प्रशासन लक्ष देणार का?

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये (nashik) दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे (Kumbh Mela) आयोजन होते. त्यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self-Government) कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र गंगा वाहती ठेवणे प्रशासनाला अद्याप जमलेले नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

नाशिकच्या पवित्र गोदावरीत (godavari) थेट नाल्यांचे पाणी येत असल्यामुळे सामान्य नागरिकांसह गोदाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

2027 मध्ये कुंभमेळ्याचे (Kumbh Mela) आयोजन होणार आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाने (Municipal administration) नमामी गोदा प्रकल्प (Namami Goda Project) राबविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

नाशिक महापालिकेत मागील पाच वर्षे भारतीय जनता पक्षाची (Bharatiya Janata Party) सत्ता होती. त्या काळात महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) असताना त्यांनी केंद्र सरकारकडे (central government) पाठपुरावा करून नमामि गंगेच्या पार्श्वभूमीवर नमामि गोदा प्रकल्प (Namami Goda Project) तयार करून केंद्र सरकारकडून तब्बल 1823 कोटी रुपयांची मान्यता मिळवली आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाच्या वतीने देखील सतत गंगेवर खर्च होत आहे. मात्र आता नव्याने एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.

टाळकुटेश्वर मंदिराच्या पुढे पुलाच्या खाली गोदावरीत नाल्याचा पाणी मिळत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे गोदाप्रेमींनी हा विषय न्यायालयात नेला असून न्यायालयात महापालिकेने नाल्याचा पाणी मिळसत नसल्याचे सांगितले असल्याची माहिती गोदाप्रेमी निशिकांत पगारे यांनी दिली आहे. तरीही मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूने नाल्यांचे पाणी गोदावरीत मिळसत असल्यामुळे प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सांडपाण्यासाठी शोषखड्डे : मित्तल

महाराष्ट्रासह (maharashtra) इतरही राज्यांना सुजलाम सुफलाम करणारी दक्षिण गंगा म्हणून जिची ओळख आहे. त्या गोदावरी नदीच्या (godavari river) उगम स्थानापासूनच तिच्या पात्रात दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी तसेच पुढे जाते. त्यामुळे ही गोदावरी मैली होत आहे. गोदावरीच्या पात्रात अशाप्रकारे सोडण्यात येणारे सांडपाणी यापुढे सोडले जाऊ नये, यासाठी त्र्यंंबकेश्वर नाशिक व निफाड तालुक्याच्या भागातून जाणार्‍या गोदावरी पात्राच्या काठावरील गावांमध्ये शोषखड्डे वा सांडपाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या असून या तीनही तालुक्यातील संबंधित गावांची यादी तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना करण्यात आल्या आहेत,अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल (Zilha Parishad Chief Executive Officer Ashima Mittal) यांनी दिली. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि निफाड तालुक्यातून गोदावरी वाहते. नदीपात्रामध्ये जाणारे सांडपाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता गोदेकाठी शोषखड्डे तयार करण्याचे नियोजन केले आहे.

याबाबत सोमवारी (दि.28) जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत गटविकास अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्याचे मित्तल यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि निफाड या तीन तालुक्यात गोदावरी नदीकाठी येणारी गावे कोणकोणती आणि किती आहेत. त्या गावांमधून जाणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे का? याबाबत उपाययोजना काय करू शकतो ?

शोषखड्डे केल्यास हे सांडपाणी नदीपात्रात मिसळणार नाही का? शोषखड्ड्यांबाबत मनरेगामधून कामे कशाप्रकारे करता येतील. यासंदर्भात तीनही तालुक्यांच्या गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात चर्चा झाली. याबाबत पुढील बैठकीत गटविकास अधिकार्‍यांनी नियोजन करावे, अशा सूचना मित्तल यांनी केल्या आहेत.

चेंबरचे काम चालू आहे, गोदावरी नदीत नाल्याचे पाणी मिसळत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाला याबाबत आदेश दिले असून दोन दिवसात हा पाणी येणे बंद होणार आहे. आपली गोदा सदैव वाहत राहावी, यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न चालू आहे, नमामि गोदा प्रकल्प देखील लवकरच सुरू होणार आहे.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त तथा प्रशासक

नाशिक महानगरपालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलेले आहे की गोदावरी नदीमध्ये कोणत्याही प्रकारची सांडपाण्याच्या गटारीचे पाणी जात नाही. परंतु सातत्याने मनपा प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदीत गटारीचे सांडपाणी सोडले जात आहे. गोदावरी नदीमध्ये गटारीचे सांडपाणी सोडणार्‍यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होत नाही, तोपर्यंत गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होणारच नाही.

-निशिकांत पगारे, याचिकाकर्ते, गोदावरी नदी प्रदूषण जनहित याचिका

- Advertisment -

ताज्या बातम्या