Thursday, May 2, 2024
Homeनाशिकपवित्र शब-ए-बारात घरीच साजरी; मशिदींचे प्रवेशद्वार होते बंद

पवित्र शब-ए-बारात घरीच साजरी; मशिदींचे प्रवेशद्वार होते बंद

जुने नाशिक | प्रतिनिधी

पवित्र शब ए बारात अर्थात ईबादतची रात्र मुस्लिम बांधवांनी आज घरीच नमाज पठण करून साजरा केली. सध्या करोना व्हायरसमुळे देशात लॉक डाऊन ची परिस्थिती आहे, तर यामुळे सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे व मशिदी बंद करण्यात आले आहे. मशीद मध्ये फक्त चारच लोक नमाज पठण करत आहेत.

- Advertisement -

इस्लाम धर्मातील तीन महत्त्वाच्या रात्रीपैकी एक असलेल्या पवित्र शबे बारात मुस्लिम बांधवांनी इस्लामी पद्धतीने मात्र घरीच साजरी केली. शबे बारातला सायंकाळी मगरिबमगरीच्या नमाज पूर्वी मुस्लिम बांधवांनी चाळीस वेळा ‘लाहोल वला कुवत’ चे पठण केले यानंतर मगरीबची नमाज अदा केली, यानंतर दोन-दोन प्रमाणे 6 रकात नमाज पठण केले.

प्रत्येक प्रत्‍येक नमाजाच्या मध्ये पवित्र कुरान शरीफची पंक्ती व दुवा एनिसफ़ शाबान यांचे वाचन केले. ज्यांना हे वाचणे किंवा पठाण करणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी शहर परिसरातील काही उलेमांनी आपली व्हॉइस क्लीप द्वारे त्यांची मदत केली. ही क्लिप मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून भाविकांनी एकमेकांना दिली होती.

यानंतर मुस्लिम बांधवांनी घरोघरी फातिहा खानी केली. यासाठी विशेष पदार्थ तयार करण्यात आले होते, यामध्ये गोड रवा अर्थात थुल्ली तसेच चपाती, भात, चपती आदी पदार्थ तयार करण्यात आले होते.

या शब मध्ये कब्रस्तानात जाऊन मृत आप्तेष्टांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या मगफेरत साठी विशेष प्रार्थना करण्यात येते, मात्र यंदा संचारबंदी आदेश लागू असल्याने कोणीही कबरस्तान मध्ये न जाता घरूनच विशेष फातिहा पठाण करून मगफिरतची दुवा केली.

शहर परिसरातील ज्येष्ठ मौलाना मंडळींनी पूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पवित्र शबे बारात निमित्त घरीच नमाज पठण करण्याची सूचना केली होती त शहर पोलीस दलाच्या वतीने देखील याबाबत आदेश काढण्यात आले होते मुस्लिम बांधवांनी कायद्याचे पालन करून शब्द घरीच साजरी केली तरी ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त होता.

शब ए बारातच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये तसेच भाविकांनी शबे बारात घरीच साजरी करावी व संचारबंदी आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी यासाठी पोलिस दलाने देखील विशेष खबरदारी घेतली होती. जुने नाशिक तसेच मुस्लिमबहुल भागातील काही मार्ग नव्याने बंद करण्यात आले होते तर आज सकाळी वडाळा मोहम्मद अली रोड, शहीद अश्फाक उल्ला खान चौक, उस्मानिया चौक, पखाल रोड, अशोका रोड, फातिमानगर व ममता नगर आदी परिसरात पोलिसांनी संचालन केले. यावेळी विविध मशिदींचे इमाम व विश्वस्त देखील सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या