Friday, May 3, 2024
Homeनगरमहापौरांसह संबंधित नगरसेवकांनाही अपात्र ठरवा

महापौरांसह संबंधित नगरसेवकांनाही अपात्र ठरवा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेने स्मशानभूमी व दफनभूमीसाठी खासगी जागा घेण्याबाबत केलेला ठराव विखंडित करावा तसेच हा बेकायदेशीर ठराव करणार्‍या महापौर रोहिणी शेंडगे यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित सर्व नगरसेवकांना महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नगरसेवक पदावर राहाण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे.

- Advertisement -

प्रधान सचिवांना त्यांनी याबाबत पत्र देऊन या सर्वप्रकाराची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. तसेच आरक्षित जागा व त्यासाठी रस्त्याच्या क्षेत्राचे सक्तीने भूसंपादन करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात यावेत, अशीही त्यांची मागणी आहे. यासंदर्भात शासनाला पाठवलेल्या पत्रात शेख यांनी म्हटले आहे की, सावेडीतील प्रभाग 1 मधील प्रस्तावित दफनभूमी-स्मशानभूमीसाठी मनपा घेणार असलेल्या खासगी जागेचे मालक शिवाजी कराळे असताना नगरसेविका आशा कराळे यांच्याशी महापौर शेंडगे यांनी पत्रव्यवहार करण्याचा उद्देश काय? तसेच, आशा कराळे यांनी संबंधित मिळकत स्वत:च्या नावावर नसतानाही महापौरांना पत्र दिले आहे. ही कृती अधिनियमानुसार पालिका सदस्य म्हणून संबंधितांना अपात्र ठरवणारी असल्याने शासनाने याबाबत कार्यवाही करावी.

दरम्यान या प्रकरणात मनपाचे पदाधिकारी व अधिकारी तसेच नगरसेवक यांनी संगनमत करून हा प्रकार केलेला आहे. मनपाच्या आर्थिक हिताच्या विरोधात निर्णय घेऊन महापालिकेने बेकायदेशीरपणे मंजूर केलेला ठराव विखंडित करण्यात यावा. याप्रकरणी महापौर, आयुक्त, नगररचना विभागाचे अधिकारी, संबंधित नगरसेवक यांची चौकशी होऊन त्यांच्या विरोधात मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शेख यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या