Tuesday, July 28, 2026
Homeक्राईमShalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप पदाधिकाऱ्याला अटक; नाशिकच्या विशेष...

Shalarth ID Scam : शालार्थ आयडी घोटाळ्यात भाजप पदाधिकाऱ्याला अटक; नाशिकच्या विशेष तपास पथकाची कारवाई

नाशिक | Nashik

राज्यभरात गाजलेल्या ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार, शिक्षण संस्थाचालक तथा भाजप पदाधिकारी संजय गरुड याला सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसमधून सोमवारी रात्री अटक केली आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील बडे संस्थाचालक असणाऱ्या गरुड यांनी २० जानेवारी २०२४ रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आता शालार्थ आयडी घोटाळ्यात तोच मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आल्याने या प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शालार्थ आयडी प्रकरणातील संजय गरुड हा सहावा आरोपी असल्याची माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक (गुन्हे) संदीप मिटके यांनी दिली आहे. तसेच
यामध्ये २०० पेक्षा अधिक शाळांचा समावेश असून, नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबारमधील ८४१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याच्या चौकशीतून बिंग फुटले

जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच ताब्यात घेतले होते. हिंगोणीकरने आपल्या पदाचा गैरवापर करत सुमारे २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे वैयक्तिक मान्यता दिली होती. यानंतर पोलिस तपासात यातील बहुतांश शिक्षक हे संजय गरुड याच्याच शैक्षणिक संस्थांमधील असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी हिंगोणीकरची कसून चौकशी केली असता त्याने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एसआयटीच्या पथकाने सोलापुरात सापळा रचून गरुडच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कोण आहे संजय गरुड?

संजय गरुडने भाजपमध्ये येण्याआधी गिरीश महाजन यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. तसेच काँग्रेसमध्ये असताना त्याने जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. जानेवारी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. गरुड हे एका मोठ्या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थाचालक आहेत. तपासादरम्यान त्यांच्याच संस्थेतील तब्बल १५० शिक्षकांच्या नावे बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Earthquake News : दिंडोरी, पेठ तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के

0
दिंडोरी | Dindori दिंडोरी तालुक्यातील वारे आणि वनारे परिसर, पेठ तालुक्यातील पवारपाडा, गावानपाडा आणि सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात आज (मंगळवारी) दुपारच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake)...