Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्या“संजय राऊत तोंड आवरा, अन्यथा पुन्हा...”: शिंदे गटाच्या मंत्र्यांचा थेट इशारा

“संजय राऊत तोंड आवरा, अन्यथा पुन्हा…”: शिंदे गटाच्या मंत्र्यांचा थेट इशारा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं. सीमाभागात निर्माण झालेल्या तणावावरून संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला काही सवालही केले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना संजय राऊत यांनी षंढ हा शब्द वापरला. त्यावर संजय राऊतांनी तोंड आवरावे, अन्यथा जशास तसे प्रत्युत्तर देऊ, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला.

- Advertisement -

आज पत्रकार परिषद घेत शंभूराज देसाईंनी सीमावादावर आपली भूमिका स्पष्ट करत संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिले. देसाई म्हणाले, सीमावादाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार केंद्रापुढे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली आहे. याप्रकरणी केंद्राने महाराष्ट्र सरकार व कर्नाटक सरकार या दोघांनी एकत्र आणून त्यांच्यात चर्चा घडवून समेटाने वाद मिटवावा, अशी मागणी शिंदेंनी केली आहे. सीमावाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्न करत असतानाही संजय राऊत त्यांना षंढ शब्द वापरत असतील तर तो आम्ही सहन करणार नाही.

शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत यांना न्यायालयीन संरक्षणात बेळगावमध्ये बोलावले होते. न्यायालयाच कवचकुंडल असतानाही ते बेळगावला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे संजय राऊत मोठे षंढ आहेत, असे म्हटले तर त्यांना चालेल का? त्यामुळे आमची संजय राऊतांना विनंती आहे की, त्यांनी आपले तोंड आवरावे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.

संजय राऊत सांगतात आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात जाऊ. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वापेक्षा त्यांना शरद पवार श्रेष्ठ वाटतात. अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना सांगत होते, संजय राऊतांपासून सावध राहावा. संजय राऊत राष्ट्रवादीच्या आरी गेले आहेत. शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला नेऊन बांधत आहेत. त्याचा प्रत्यय संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून आला आहे, असे शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या