Saturday, September 26, 2026
Homeनगरशनैश्वर देवस्थान अ‍ॅप घोटाळा चौकशी प्रकरणी 8 आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश

शनैश्वर देवस्थान अ‍ॅप घोटाळा चौकशी प्रकरणी 8 आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश

शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur

श्री शनैश्वर देवस्थान मधील कथित गैरव्यवहाराच्या (अ‍ॅप घोटाळा) चौकशी संदर्भातील 8 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते सचिन दरंदले यांनी दिली. घोटाळेबाजांवर कारवाई कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी याचिकाकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांना वैयक्तिक सुनावणीची संधी देण्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

- Advertisement -

सोनई येथील याचिकाकर्ते सचिन दरंदले यांनी 22 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्र्याकडे सादर केलेल्या निवेदनात शनैश्वर देवस्थानातील कथित आर्थिक गैरव्यवहार, बनावट पूजा, बनावट पावती बुक, क्यूआर कोड, व्यवहारातील अनियमितता, बनावट पावती पुस्तके, अतिरिक्त कर्मचारी भरती, तसेच मागील दहा वर्षाच्या आर्थिक व्यवहाराची सीबीआय मार्फत चौकशी व स्वतंत्र लेखा परीक्षणाची मागणी केलेली होती, मात्र त्यावर काहीही निर्णय न झाल्याने दरंदले यांच्यावतीने अ‍ॅड. उमाकांत वाघ यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी व न्यायमूर्ती आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी होऊन सरकारला 8 दिवसात या गैरव्यवहाराबाबत निर्णय घेण्याचे सुचित केलेले आहे.

याचीकाकर्त्यांनी जमा केलेली पाच लाख रुपये रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना येत्या आठवड्यात दरंदले यांच्या निवेदनावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ते सचिन दरंदले यांच्या बाजूने अ‍ॅड. उमाकांत वाघ यांनी तर सरकारी पक्षाकडून सरकारी वकील एन. एस. टेकाळे यांनी बाजू मांडली.

खंडपिठाच्या निर्णयाचे स्वागत करतो. सरकारने दोषीवर आयोध्या मंदिर प्रकरणाप्रमाणे कठोर कारवाई करून न्याय द्यावा अन्यथा दोन महिन्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचीही तयारी ठेवली आहे.
– सचिन दरंदले याचिकाकर्ता, सोनई

ताज्या बातम्या

Maharashtra Drought : अखेर राज्यात दुष्काळ जाहीर; CM फडणवीसांचा मोठा निर्णय,...

0
मुंबई | Mumbai राज्यात पावसाने (Rain) दिलेल्या दीर्घ ओढीमुळे निर्माण झालेल्या गंभीर टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...