Monday, December 2, 2024
Homeनगरशनीअमावास्येनिमित्त शिंगणापुरात चार लाख भाविकांचे दर्शन

शनीअमावास्येनिमित्त शिंगणापुरात चार लाख भाविकांचे दर्शन

शनिशिंगणापूर् |वार्ताहर| Shanishinganapur

शनीअमावास्येनिमित्त शनिशिंगणापूर (Shanishinganapur) येथे आज 4 लाखाहून अधिक भाविकांनी (Devotee) शनिदेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास शनिअमावास्या सुरू झाली तेव्हा सकाळी गर्दी अत्यल्प होती. त्यानंतर दुपारपासून भाविकांचा ओघ वाढला. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पार्किंग व्यवस्था मुळा कारखाना, घोडेगाव रोड, संभाजीनगर हायवे, कांगोणी रोड आदी ठिकाणी केली होती. दुपारपासून दर्शनरांगेत सुरू राहिलेली गर्दी सायंकाळपर्यंत टिकून होती. शिंगणापूरकडे येणार्‍या मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली होती.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक खगेन्द्र टेंभेकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शनिवारी सकाळपासून शिंगणापूरात (Shanishinganapur) वाहनांची संख्या वाढत होती तरी वाहतूक कोंडी मात्र कुठेही दिसली नाही. शिंगणापुरातील मुख्य चौकासह शनिवारी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडत असलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. शनैश्वर देवस्थानच्या प्रसादालयात शनिवारी सायंकाळपर्यंत अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारीही भाविकांची अशीच गर्दी राहील, असा अंदाज आहे. शनिवारी सकाळची आरती माजी खासदार चंद्रकांत खैरे, दुपारची आरती जयेश शहा, तर सायंकाळी आरती उद्योगपती सौरभ बोरा, राहुल हेगडे यांच्या हस्ते करण्यात आली.

शनीअमावस्या यात्रेनिमित्ताने आ. शिवाजी कर्डिले, आ. विठ्ठलराव लंघे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नागपूर महानगरपालिकेचे उपमहापौर वैभव जोशी, मराठा महासंघाचे नेते संभाजी दहातोंडे आदींनी शनिदेवाचे दर्शन घेतले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट केलेली होती. मंदिर परिसरात भाविकांना ठिकठिकाणी पाणी व्यवस्था, भंडारा प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.

20 वर्षांनी शनिदेव पावले
आ. विठ्ठलराव लघे यांचा नेवासा-शेवगाव मतदार संघात 2004 मध्ये घुले-लंघे लढतीत पराभव, त्यानंतर 2009 मध्ये गडाखां विरुद्ध पराभव आणि आता थेट 20 वर्षांनी मला शानिदेवांनी आशीर्वाद दिला याची आठवण करून जनतेची सेवा, देवस्थानांसाठी भरीव मदत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. विठ्ठलराव लंघे यांनी सागितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्विय सहायक राकेश मोदी यांनी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री विराजमान होवो यासाठी शानीचरणी 21 लिटर तेल अभिषेक, पूजा, करून संकल्प केला. देवस्थानचे वतीने अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, अ‍ॅड. सयारम बानकर, चिटणीस आप्पासाहेब शेटे, विश्वस्त पोपटराव शेटे आदींनी स्वागत केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या