Monday, July 27, 2026
HomeनगरAhilyanagar : 11 जूनपासून रात्री 10.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत शनीदर्शन राहणार...

Ahilyanagar : 11 जूनपासून रात्री 10.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत शनीदर्शन राहणार बंद

शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur

श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनि देवाचे दर्शन 11 जूनपासून रात्री साडेदहा ते पहाटे चार वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय शनैश्वर देवस्थानच्या प्रशासन विभागाने घेतला आहे. शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या 27 मे च्या झालेल्या संयुक्त बैठकीतील हा निर्णय हा 11 जूनपासून अंमलात येणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

- Advertisement -

शनिशिंगणापुरातील स्वच्छता व सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेलेला आहे. मात्र श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर गुढीपाडवा, शनी अमावास्या, शनि जयंती या उत्सवात शनी मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले असणार आहे.

अन्य निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रतिक्षा
11 जूननंतर शनी मंदिर परिसरातील भिकारी हटाव चा निर्णय तसेच पूजेचे साहित्याचे विक्री फलक व पूजा विधी फलक लावण्याचा निर्णय झालेला आहे. दरम्यान शिंगणापूर पोलीस ठाण्यासमोर व परिसरात भाविकांना अडवण्यासाठी कमिशन एजंटांचा बंदोबस्त करण्यास पोलीस प्रशासन असमर्थ ठरल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

गावकर्‍यांना दर्शनासाठी आधारकार्ड अनिवार्य
देवस्थानच्या निर्णयानुसार 11 जूनपासून पहाटे चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी आरती पूर्वी अर्धा तास व आरती नंतर एक तास या कालावधीत शिंगणापूर येथील ग्रामस्थ दर्शनासाठी दक्षिणेच्या बाजूस असलेल्या गावकरी गेटमधून आधार कार्ड दाखवूनच ग्रामस्थांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्याबरोबर येणार्‍या अन्य कुणालाही प्रवेश नसणार आहे. हा निर्णय अंमलात आणण्यासाठी देवस्थान प्रशासनाला ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

पडताळणीनंतर पोलिसांत रीतसर तक्रार करणार, पेपरफुटीवर MPSC चे स्पष्टीकरण

0
मुंबई । Mumbai NEET आणि इतर राष्ट्रीय परीक्षांमधील घोळ ताजे असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांवरही पेपरफुटीचे गंभीर सावट पसरले आहे. अन्न व औषध...