Friday, September 25, 2026
HomeनगरNewasa : शनि शिंगणापुरात कमिशन एजंटांना प्रतिबंध

Newasa : शनि शिंगणापुरात कमिशन एजंटांना प्रतिबंध

भाविकांना त्रास होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकार्‍यांचे आदेश

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

शनिशिंगणापूर येथे देशभरातून येणार्‍या भाविकांची कमिशन एजंटांकडून (लटकू) होणारी आर्थिक पिळवणूक, फसवणूक व असुविधा रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 152 (1) (र) अन्वये शिंगणापूर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

- Advertisement -

शनिशिंगणापूर हे ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, शनिशिंगणापूर पोलीस ठाणे आणि नेवासा तहसीलदार यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, मंदिर परिसर तसेच गावाच्या बाहेरील रस्त्यांवर काही खासगी व्यक्ती (एजंट/लटकू) भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानांतूनच चढ्या दराने पूजा साहित्य खरेदी करण्यास भाग पाडतात. भाविकांनी यास विरोध केल्यास त्यांना दमदाटी व शिवीगाळ केली जाते. सन 2025 मध्ये अशा प्रकारच्या 53 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या प्रकारांमुळे भाविकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 223 अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, या आदेशाने प्रभावित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला दिनांक 28 जानेवारी पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर यांच्या कार्यालयात उपस्थित राहून आपली बाजू किंवा हरकत नोंदवता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...