Friday, January 30, 2026
HomeनगरNewasa : शिंगणापूर देवस्थान येथे ई-ऑफीस प्रणाली कार्यान्वित होणार

Newasa : शिंगणापूर देवस्थान येथे ई-ऑफीस प्रणाली कार्यान्वित होणार

सोनई |वार्ताहर| Sonai

शनि शिंगणापूर देवस्थानचा कारभार विभागीय आयुक्त यांनी हातात घेतल्यापासून अनेक चांगले सकारात्मक बदल दिसून येत आहे. विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार श्री शनैश्वर देवस्थानात ई-ऑफीस प्रणालीची अंमलबजावणी साठी अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण पार पडले.

- Advertisement -

प्रशासक तथा विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार श्री शनेश्वर देवस्थान, शिंगणापूर येथे शासनाची ई-ऑफीस (इलेक्ट्रॉनिक कार्यालय) प्रणाली अंमलात आणण्याची प्रक्रिया अधिकृतरीत्या सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने गुरुवार दि. 29 जानेवारी रोजी देवस्थानातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी या प्रणालीबाबत सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदरील प्रशिक्षण विभागीय आयुक्त कार्यालय येथील कृणाल दारुंडे व अतुल चोरमारे यांनी दिले.

YouTube video player

प्रशिक्षणामध्ये शासनाच्या ई-ऑफीस प्रणालीचा वापर करून फाईल नोंदणी, पत्रव्यवहार, मंजुरी प्रक्रिया, नोंदींचे जतन, तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाज कागदविरहित पद्धतीने कसे करावे याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे देवस्थानचे प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक, वेळबद्ध, उत्तरदायी व कार्यक्षम होणार असून शासनाच्या डिजिटल प्रशासन धोरणाशी सुसंगत अशी आधुनिक व्यवस्था देवस्थानात उभी राहत आहे.

कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, प्रशासक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शनैश्वर देवस्थानचे प्रशासकीय कामकाज आधुनिक व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने प्रणालीची अंमलबजावणी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रणालीमुळे देवस्थानातील निर्णय प्रक्रिया अधिक सुटसुटीत होईल तसेच कामकाजात शिस्त व पारदर्शकता येईल. पुढील काळात देवस्थानातील सर्व प्रशासकीय व्यवहार या द्वारेच करण्याचे नियोजन आहे. देवस्थान प्रशासनामार्फत टप्प्याटप्प्याने सर्व विभागांचे कामकाज या प्रणालीवर आणण्याची कार्यवाही सुरू आहे.

ताज्या बातम्या

अंबडच्या हद्दीत हवेत गोळीबार ?

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत छत्रपती शिवाजी चौकात गोळीबाराची घटना घडल्याचे कळते .यावेळी संशयितांनी एका चारचाकी गाडीच्या काचा देखील फोडल्या...