Friday, May 3, 2024
Homeनगरगोरे यांनी स्वीकारला आयुक्तांचा पदभार

गोरे यांनी स्वीकारला आयुक्तांचा पदभार

अहमदनगर (प्रतिनिधी) –

चाळीसगावहून बढतीवर आलेले शंकर गोरे यांनी आज गुरूवारी सकाळी नगर महापालिकेच्या

- Advertisement -

आयुक्त पदाचा पदभार हाती घेतला. पहिल्या दिवशी आयुक्त गोरे यांनी विभागप्रमुखांची बैठक घेत महापालिकेची माहिती घेतली.

चाळीसगाव नगरपालिकेत मुख्याधिकारी असलेले शंकर गोरे यांची नगर महापालिकेत आयुक्त म्हणून बदली झाली. घरगुती कारणामुळे ते रजेवर होते. आज सकाळी ते नगरला आले आणि आयुक्त पदाचा पदभार हाती घेतला.

उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे, सहाय्यक आयुक्त संतोष लांडगे, दिनेश सिनारे, सचिन राऊत, उद्यान निरिक्षक शशिकांत नजन, गवाजी झिने शेखर देशपांडे यांनी त्यांचे स्वागत केले. स्वागतानंतर आयुक्त गोरे यांनी लगेचच विभागप्रमुखाची बैठक बोलविली. उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या