Friday, May 3, 2024
Homeराजकीय‘काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून करोना जाईल’

‘काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून करोना जाईल’

सोलापूर |Solapur – उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामाला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराचं (Ram Mandir) भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की करोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून करोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलं. ते सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -

ते म्हणाले, करोनामुळे नागरिकांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. करोना संकटात सापडलेल्या लोकांना कसं बाहेर काढायचं याबाबत आम्ही विचार करत आहोत, त्याला आम्ही प्राधान्य देत आहेत. काही लोकांना वाटत असेल मंदिर बांधून करोना जाईल. त्यामुळे राममंदिर बांधण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा, त्याबाबत मला माहिती नाही.

राज्य आणि केंद्र सरकारने करोना संकटातून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. या परिस्थितील लोकांना मदत करण्यास प्राधन्य दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील.

https://www.deshdoot.com/political-news/pravin-darekar-comment-sharad-pawar-statement-ram-mandir

- Advertisment -

ताज्या बातम्या