Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : पवार, पिचड अन झारीतील शुक्राचार्य

Video : पवार, पिचड अन झारीतील शुक्राचार्य

अकोले। Akole

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजप नेते मधुकर पिचड यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख झारीतील शुक्राचार्य असा केल्याने राजकीय चर्चेने जोर पकडला आहे.

- Advertisement -

आज शेंडी येथील कार्यक्रमात त्यांनी तालुक्याच्या विकासासोबत अगस्ती कारखान्याचा विषय छेडला.

ते म्हणाले, कारखाना सुरू करण्यासाठी 35 कोटी लागले. आज डोक्यावर 200 कोटी कर्ज करून ठेवलं आहे. कारखाना वाचवायचा असेल तर आधी झारीतील शुक्राचार्यांना बाजूला काढा, पाहीजे ती मदत करतो.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिचड यांनी पवारांची साथ सोडली. त्यावरून पवारांची नाराजी वारंवार दिसून आली आहे. आज त्यांनी पिचडांना पुढील राजकीय वाटचालीसाठी इशाराच दिल्याचे मानले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या