Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : "अजित पवार मुख्यमंत्री होतील पण..."; शरद पवारांचा दादांना चिमटा,...

Sharad Pawar : “अजित पवार मुख्यमंत्री होतील पण…”; शरद पवारांचा दादांना चिमटा, भुजबळांवरही साधला निशाणा

अकोला | Akola

काही महिन्यांपूर्वी अजित पवारांसह (Ajit Pawar) बडे नेते राष्ट्रवादीतून (NCP) बाहेर पडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून सातत्याने आधी घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत…

- Advertisement -

त्यातच काही दिवसांपासून भाजपसह (BJP) अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) शरद पवारांवर भाजपसोबत जाण्याबरोबरच त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यापर्यंत आरोप करण्यात आले आहेत. त्या आरोपांना आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील मुख्यमंत्रीपदावरून टोला लगावला.

Train Accident News : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले; ४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “आमच्यातील काही लोकांचा भाजप सोबत जाण्याचा आग्रह होता, मात्र त्यास आमचा विरोध होता. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव भुजबळांचाच होता. तसेच छगन भुजबळ काहीही बोलतात, त्यांना फार महत्व देवू नका, ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत? मात्र निवडून आल्यावर ते भाजपसोबत जातात. त्याबद्दल काय बोलायचे,” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाच्याविरोधातील लढाईत जे सोबत येतील, त्यांना आघाडीत घेऊन पुढे जाणार आहोत. राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष यांची तीन पक्षांची आघाडी आहे. काही छोटे मोठे पक्ष सोबत येतील. शेतकरी कामगार पक्ष व इतरीही काही पक्ष सोबत येत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.

Maharashtra Congress : काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांमध्ये तुफान राडा: विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यासमोरच दोन गट भिडले

तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी इंडिया आघाडीत घेण्याबाबत पत्रकारांनी पवारांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. मात्र समान कार्यक्रमावर भाजपविरोधातील ज्या शक्ती एकत्र येऊ शकतील. यामध्ये यापूर्वी काय झालं याचा विचार न करता त्यांना सहभागी करावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. बाकीच्या लोकांना देखील विश्वासात घ्यावे लागेल, असे पवार यांनी सांगितले म्हणाले.

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरुन देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “भाजपसोबत गेलेले अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचा स्वप्नं हे स्वप्नंच राहणार आहे. कारण देशातील चित्र हे भाजपच्या विरोधात आहे, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल,” असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. तसेच यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून लिहलेल्या पत्रावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “युएनचा अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले तरी हरकत नाही” असे म्हणत त्यांनी खोचक टीका केली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

भुजबळांची कबुली, शरद पवारांवरील ‘ते’ आरोप ठरले खोटे; नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

- Advertisment -

ताज्या बातम्या