Friday, May 3, 2024
Homeराजकीयपवार साहेब, राजकारणाच्या महासागरातील दीपस्तंभ !

पवार साहेब, राजकारणाच्या महासागरातील दीपस्तंभ !

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार साहेब म्हणजे राजकारणाच्या महासागरातील दीपस्तंभ असून राजकीय पक्षांचे विचार वेगवेगळे असू शकतात.

- Advertisement -

मात्र, पवारसोहब यांच्यासारखे नेतृत्व असलेल्या सर्वांना हा माणूस हवा असे वाटणे हेच या बहुआयामी नेतृत्वाचे यश आहे, असे गौरव उद्गार शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी काढले.

राष्ट्रवादी काँगे्रसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासह विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार ईश्वरलाला जैन, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, माजी आमदार मनीष जैन, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, महिला आघाडीच्या कल्पना पाटील, मंगला पाटील, अशोक पाटील, अरविंद मानकरी, अ‍ॅड. कुणार पवार, राजेश पाटील, माजी नगरसेविका लता मोरे, पिणाज फनी बनदा, ममता तडवी, वंदना चौधरी, अर्चना कदम, मनिषा चव्हाण, कमल पाटील,शकीला तडवी, सलीम इनामदार,मझर पठाण, रिजवान खाटीक, अकील पटेल, अशोक सोनवणे, अशोक लाडवंजारी,सुनील माळी, राजेश गोयर,ज्ञानेश्वर मोरे, स्वप्नील नेमाडे,तुषार इंगळे,अक्षय वंजारी, उज्जवल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शनिवारी सकाळी 10 वाजता सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्वजाला सलामी देवून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याहस्ते 80 किलोचा केक कापून पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शरद पवार साहेब यांचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, अशा विविध घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.

यावेळी एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, सर्वच क्षेत्रांमध्ये यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाची गरज सर्वांनाच राहणार आहे. ते राजकारणात असले तरी चौफेर अभ्यास आणि स्वारस्य हे त्यांच्या नेतृत्वाचे खरे रहस्य म्हणता येईल.

सामाजिक जाणिवांचा प्रगल्भ चिन्तन असणारा हा नेता कला आणि साहित्यातही तितकाच रमतो. त्यामुळे ते आता 80 वर्षांचे झाले असले तरी कोणत्याही क्षेत्रातील प्रत्येकाला वाटते हा माणूस आपल्यसाठी असावा.

बॉम्ब स्फोट मालिका झाल्यावर मुंबई हादरली, स्तब्ध झाली, मुकी झाली; प्रत्येकाच्या मनात भय आणि शंका होत्या. मात्र, नंतरच्या आठवडाभरात मुंबई सावरली ती शरद पवारांमुळंचं. त्या काळातील परिस्थिती सुरळीत करण्याची ताकद त्यांनी दाखवली.

आपत्ती व्यवस्थापन कसे असते हे सांगणारा आणि ते करणारा त्यांच्यासारखा दुसरा कुणी माणूस नाही. किल्लारीच्या भूकंपात हजारो माणसं गेलीत, हजारो निर्वासित झाली त्यावेळी याच माणसाने समाजातला माणूस उभा केला.

जिद्दीने त्याला प्रोत्साहन दिले. त्यातूनच पुढे गुजरातेतील भूकंपाच्या आपत्तींत अटलजींनी शरद पवार यांची जाण आणि आठवण ठेवली आणि तेथील आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी दिली.

वर्षानुवर्षे काम करताना सार्‍या समाजातून हा नेता जोडून राहणारा आहे ही ख्याती त्यांना आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.एस.महाजन यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या