Sunday, October 13, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांची मोठी कारवाई; प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी

शरद पवारांची मोठी कारवाई; प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी

मुंबई | Mumbai

काल (दि.०२) रोजी अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड करत राष्ट्रवादीला (NCP) मोठे खिंडार पाडले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज सकाळपासून शरद पवारांच्या (Sharad Pawar) नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादीच्या गटाने अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यास सुरुवात केली आहे…

- Advertisement -

मोठी बातमी! मुंबई, पुण्यात NIA ची छापेमारी; ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौघांना घेतले ताब्यात

त्यानंतर आता शरद पवारांनी अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली आहे. आज राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून पटेल आणि तटकरे यांना पक्षातून हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर शरद पवारांनी दोघांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; कार थेट ३० फुट खाली कोसळली

सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटले होते की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी २ जुलै २०२३ रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडले त्यामुळे ते अपात्र ठरले आहेत. यानंतर आता माझी शरद पवारांना विनंती आहे की, त्यांनी तात्काळ कारवाई करून पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याप्रकरणी भारतीय राज्यघटनेच्या १० व्या अनुसूची अंतर्गत संसद सदस्य प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात सक्षम प्राधिकाऱ्यासमोर अपात्रतेची याचिका दाखल करावी, असे म्हटले होते.

राष्ट्रवादीची याचिका, अजित पवारांसह मंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, यानंतर शरद पवारांनी पक्षाविरोधी कारवाई (Anti-Party Action) केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच या दोघांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देखील शरद पवारांनी दिले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या