Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्या''शरद पवारच खरे ओबीसी नेते''; बच्चू कडूंचे विधान

”शरद पवारच खरे ओबीसी नेते”; बच्चू कडूंचे विधान

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Arakshan)आंदोलन सुरू आहे. त्यातच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तर दुसरीकडे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) आणि ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे, यावर आता आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शरद पवारांनी एका पत्रात ५२ जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. त्यामुळे खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत,” असे वक्तव्य बच्चू कडूंनी केले आहे. बच्चू कडूंनी गुरूवारी मनोज जरांगे-पाटील यांची रूग्णालयात भेट घेतली. ५२ जाती एका पत्रामुळे ओबीसीमध्ये येत असतील तर मराठा समाजाचे सर्व वस्तुस्थितीला धरुन असुनही का होत नाही, हा मुळात प्रश्न आहे, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षाणासाठी दिलेल्या मुदतीबद्दल सरकारचे शिष्टमंडळ जरांगे – पाटीलांची भेट कधी घेणार या बद्दल विचारल्यावर याबाबत बच्चू कडू म्हणाले, “सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे-पाटलांची भेट घेऊन चर्चा करायला हवी होती. जरांगे-पाटलांनी आंदोलन मागे घेतले नसते, तर सरकारला परिणाम भोगावे लागते असते. सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे.”

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण न देण्यासाठी दबाव आहे का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, दबावाचे कारण नाही. थोडीच अमेरिकेतून आणलेल्या लोकांना ओबीसीमधून आरक्षण देतोय. मराठा समाज हा देशातीलच आहे. मराठा समाजाला गृहित धरूनच ओबीसी आरक्षण देण्यात आले होते. काहीजण पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाचे काही देणे-घेणे नाही.”

मनोज जरांगे पाटील पुन्हा दौरा करणार

मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करण्याचे निश्चित केले असून याबाबतची घोषणाही केली आहे. १५ नोव्हेंबरपासून त्यांच्या दौऱ्याची सुरवात होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. आम्ही राज्यातील मराठा समाजाची गाठीभेटी घेण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करत आहे.

१५ नोव्हेंबर २०२३ पासून ते २३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत हा तिसरा टप्पा सुरू करत आहे. तिसऱ्या टप्प्यातील १५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा. १६ रोजी दौड, मायणी. १७ रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड. १८ रोजी सातारा, मेंढा, वाईस रायगड. १९ रोजी रायगड, रायगड दर्शन, रायगड ते पाचाड, महाड, मुळशी, आळंदी. २० रोजी आळंदी, तुळापूर, खालापूर, कल्याण, २१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक, त्रंबकेश्वर. २२ रोजी विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपूर. २३ रोजी नेवासा, शेवगाव, भोदेगाव, अवमापूर, धोंडेगाव. हा तिसऱ्या टप्प्यातील दौरा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या