Friday, May 3, 2024
Homeनगरआ. लंके यांनी पारनेरचा चेहरामोहरा बदलला

आ. लंके यांनी पारनेरचा चेहरामोहरा बदलला

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

आ. निलेश लंके यांनी पारनेर-नगर मतदारसंघाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून पारनेर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. करोना काळात हजारो लोकांना जीवनदान देऊन अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय उपक्रम राबवत तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. संघर्षशील पारनेरला आ. लंके यांच्या रूपाने सुवर्ण माणूस लाभला आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आ. लंके यांच्या कार्याचा गौरव कौतुक केले.

- Advertisement -

पारनेर-नगरचे आ. लंके यांच्या वाढदिवस व निघोज ग्रामीण पतसंस्थेच्या नामकराच्या निमित्ताने खा. पवार शुक्रवारी निघोज येथे आले होते. यावेळी आ. लंके यांच्यावतीने सात हजार विद्यार्थीना सायकल वाटप, शंभर घरकुले व 50 व्यावसारिक वाहनाचे वाटप खा. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा. पवार बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील रांनी आ. लंके यांच्या कार्याच्या गुणगौरव करत पक्ष आ. लंके यांच्या पाठीशी खंबीर उभा असून पारनेरकर जनतेनेही आ. लंके यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे आवाहन केले. कार्यक्रमात खा. पवार आणि आ. वळसे पाटील यांनी लंकेच्या करोना काळातील कामाचे तोंड भरुन कौतुक केले.

यावेळी आ. लंके म्हणाले, खा. पवार यांचे हात डोक्यावर असल्याने कोणत्याच कामात अडचण येत नाही. तसेच भविष्यात त्यांच्याच पाठबळावर तालुक्यात भव्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा मानस असून मी माझे सर्व हट्ट खा. पवार यांच्याकडून पूर्ण करून घेतो. कार्यक्रमाला निघोज पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद, माजी आ. पोपटराव गावडे, दादाभाऊ कळमकर, राहुल जगताप, शुंभागी पाटील, अरुण कडू, घनश्राम शेलार, प्रतापराव ढाकणे, राजेंद्र फाळके, सुरेश वाबळे, प्रशांत गायकवाड, सुमनताई शेळके, राणीताई लंके, संदीप वर्पे, विजर औटी, अर्जुन भालेकर, अशोक सांवत, बापू शिर्के, सुदाम पवार यांच्यासह राज्यभरातून कार्रकर्ते उपस्थित होते. तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी सर्वाचे स्वागत केले.

999 रुपयांत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी रोधिनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी पुणे, मुंबई, दिल्ली रेथे राहू शकत नाहीत. मोठ्या शहरातील आर्थिक खर्च पेलवत नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी याच्या 999 रुपयात नीलेश लंके प्रबोधिनीच्या माध्यमातून अभ्यासिकेची सुविधा निर्माण केली आहे. निघोज व कान्हूर पठार येथे तीन कोटी रुपरांच्या दोन अभ्यासिका उभारण्यात आल्या आहेत.

पारनेर दुष्काळी तालुका असला तरी अनेक सहकार व राजकीय चळवळीत योगदान दिले आहे. कष्टकरी माणसाला उभे करण्याचे काम पारनेरच्या संघर्षशील माणसाने केले आहे. जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा सुमन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम चालू आहे. कष्ट करण्याचे, घाम गळण्याचे काम करत पारनेर तालुका कर्तृत्व व मेहनतीवर चारचाकी घेऊन फिरतो, ही अभिमानाची बाब असल्याचे खा. पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या