Friday, November 22, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांचे प्रफुल्ल पटेलांच्या आरोपांवर प्रत्युत्तर; म्हणाले, "मला त्याच संध्याकाळी पंतप्रधानपदाचा…"

शरद पवारांचे प्रफुल्ल पटेलांच्या आरोपांवर प्रत्युत्तर; म्हणाले, “मला त्याच संध्याकाळी पंतप्रधानपदाचा…”

मुंबई | Mumbai

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु असून विविध राजकीय पक्षांचे नेते वृत्तवाहिन्यांसह वृत्तपत्रांना मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमधून हे राजकीय नेते अनकेदा त्यांच्या पक्षांत घडलेल्या जुन्या गोष्टींचा उलगडा करत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असून राजकीय वातावरण चांगलेच तापतांना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी “१९९६ मध्ये शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी होती. पण, त्यांनी खच खाल्ली, या केलेल्या आरोपांवर आपली भूमिका मांडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : अजित पवारांच्या ‘त्या’ नेहमीच्या खदखदीवर शरद पवारांचे थेट उत्तर; म्हणाले…

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “एच. डी. देवेगौडा यांनी राजीनामा दिल्यानंतर मी पंतप्रधानपदाची संधी घालविली, असे विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले असले तरी हे विधान अर्धसत्य आहे. मी पंतप्रधानपद स्वीकारावे, अशी प्रफुल्ल पटेल यांच्यासह काँग्रेसमधील (Congress) अनेक नेत्यांची इच्छा होती. त्यावेळी काँग्रेसच्या बहुसंख्य खासदारांचा मला पाठिंबा देखील होता. कारण तेव्हा मी काँग्रेस पक्षाचा गटनेता होतो. पण वेगळं काही घडत असल्याचे माझ्या लक्षात आले होते. काँग्रेसमधील काही नेतेमंडळी माझ्या विरोधात होती. मी पंतप्रधानपदावर दावा करून हे पद मिळवले असते, तर शपथविधी झाला त्याच दिवशी सायंकाळी राजीनामा (Resignation) देण्याची वेळ माझ्यावर आली असती. कारण मी पंतप्रधानपदावर (PM Post) विराजमान झाल्यावर लगेचच पाठिंबा काढून घेण्याचे कटकारस्थान काही मंडळींनी केले असते,” असे पवारांनी म्हटले.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “… तर तेव्हाच मी राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो”; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

शरद पवार पुढे म्हणाले की, “पंतप्रधानपदाचा एक वेगळाच सन्मान असतो. काहीही करून मला ते पद मिळवायचे आहे, असं माझं नव्हते. मला त्या पदाची गरिमा घालवायची नव्हती. म्हणूनच मी आग्रह झाला तरी पंतप्रधानपद स्वीकारायचे नाही, असा निर्णय घेतला होता. पंतप्रधानपद मिळाले नाही याची मला अजिबात खंत नाही. राजकारणात येणाऱ्या प्रत्येकाला हे पद मिळेल असं नसते. मला तरुण वयात आमदारकी, मंत्रीपद मिळाले. मी माझ्या राजकीय कारकीर्दीबाबत समाधानी आहे” असंही शरद पवार यांनी म्हटले.

हे देखील वाचा : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या